आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक महान क्रांतीकारक होते त्यांचा जन्म १८ नोव्हेंबर १८०५ रोजी एका महादेव कोळी परिवारात झाला त्यांचे मूळ गाव देवगाव तालुका अकोले जिल्हा अहमदनगर भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात राघोजी भांगरे यांचे मोठे योगदान होते अशा महापुरुषाचे मुदखेड ते बेंबर रस्त्यावर असलेल्या चौकाला देण्यात यावे व नामकरण करण्यात यावे अशा पद्धतीचे निवेदन
कार्यकर्त्यांनी भोकरच्या तहसीलदासह उपविभागीय अधिकारी यांनी आदिवासी विकास संघटना महाराष्ट्र राज्य प्रदेश सचिव विजय कुमार पाटील मोरे यांनी मागणीचे निवेदन दिले आहें परकीय सत्ते विरोधात लढणा-या आदिवासी बंडखोरांमध्ये राघोजी भांगरे हा एक भक्कम, ताकदवान आणि धाडसी बंडखोर नेता होता पेशवाई बुडाल्या नंतर इंग्रजांनी महादेव कोळ्यांचे सह्याद्रीतील किल्ले, घाटमाथे राखण्याचे अधिकार काढून घेतले होते किल्ल्याच्य शिलेदारी वतनदारी काढल्या होत्या बुरूज नष्ट केले होते पगारी देणे कमी केले होते इंग्रजांनी परंपरागत अधिकार काढून घेतल्याने महादेव कोळ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला होता त्याच कालावधीत शेतसारा वाढवण्यात आला होता शेतसारा वसुलीमुळे गोर गरीब आदिवासी बांधवांना रोख पैशांची गरज भासू लागली होती
कर्ज वसूली करताना सावकार मनमानी करू लागले होते कर्जाच्या मोबदल्यात आदिवासींच्या जमिनी बळकावू लागले होते म्हणून आदिवासी बांधव सावकारांवर व इंग्रजांवर चिडले होते.रामाचा जोड़ीदार राघोजी भांगरे याने सरकार विरोधी बंडात सामील होऊ नये,यासाठी त्याला मोठ्या नोकरीवर घेतले परंतु नोकरीत पदोपदी होणारा अपमान आणि पगारातली काटछाट
यामुळे राघोजी चिडला होता नोकरी सोडून त्याने बंडात उडी घेतली.उत्तर पुणे जिल्ह्यात व नगर जिल्ह्यात राघोजी आणि बापूजी भांगरे यांच्या नेतृत्वाखाली उठाव सुरू झाला होता अशा आद्य क्रांतीकारक राघोजी भांगरे यांचे नाव चौकाला देण्यात यावे असे. पद्धतीचे निवेदन आदिवासी विकास संघटना महाराष्ट्र प्रदेश महासचिव विजयकुमार पाटील मोरे यांच्या मार्फत देण्यात आले आहें.
0 Comments