Ticker

6/recent/ticker-posts

घोसरी येथील स्मशानभूमीचे बांधकाम प्रलंबित! दफनविधीसाठी ग्रामस्थांना अंत्ययात्रा घेऊन जावे लागते लाल हेटीच्या स्मशानभूमीत



विजय जाधव, नांदगाव: चंद्रपूर जिल्ह्यात शहरी भागात मोक्षधाम तर ग्रामीण भागात स्मशानभूमी शेड उभारण्यात आले आहेत. स्मशानभूमी साठी शासनाकडून विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामपंचायतींना थेट निधीची सुद्धा पूर्तता केली जाते. अनेक गावात स्मशानभूमी शेड उभारण्यात आले आहेत. परंतु पोंभुर्णा तालुक्यातील राजकीय दृष्ट्या अतिशय संवेदनशील समजल्या जाणाऱ्या घोसरी या गावात ही योजना अपवाद ठरल्याचे दिसून येत आहे.
सन 2018 ते 19 या वर्षात गावात स्मशानभूमीच्या बांधकामासाठी जन सुविधा योजना अंतर्गत 4 लक्ष 88 हजार 660 रुपयांचा निधी मंजूर झाला. परंतु तत्कालीन ग्रामपंचायत कमिटीच्या उदासीनतेमुळे सन 2018 पासून स्मशान भूमी शेडचे बांधकाम अपूर्ण आहे. ग्रामपंचायतीला संपूर्ण निधी प्राप्त झाला. ग्रामपंचायत स्तरावरून कंत्राट दारा मार्फत सदर कामाला सुरुवातही करण्यात आली परंतु अजूनही काम पूर्ण झाले नाही. आणि वाजवीपेक्षा जास्त कामाची देखील कंत्राटदाराला अदा करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
निधी प्राप्त होऊ नये काम पूर्णत्वास आले नाही. त्यामुळे ग्रामस्थांना अंत्यविधीसाठी स्मशानभूमी अभावी कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. नाईलाजाने लाल हेटी येथील स्मशानभूमीत घोसरी येथील नागरिकांना अंत्यविधीसाठी मृतदेह, प्रेतयात्रा घेऊन जावे लागत आहे.
येथील भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते सुधीर वडपल्लीवार यांच्या अंत्ययात्रेत शेकडोच्या संख्येने नातलग आणि आप्तेष्ट मित्रमंडळी सहभागी झाले होते परंतु सदर गावात स्मशानभूमी शेड नसल्याची माहिती प्रस्तुत प्रतिनिधीला माहिती झाली. प्रस्तुत प्रतिनिधीने याबाबत ग्रामस्थांना विचारणा केली असता सदर माहिती ग्रामस्थांनी दिली. तत्कालीन सरपंच व सचिव आणि ग्रामपंचायत कमिटी याला जबाबदार असल्याचा आरोप नागरिकांनी केला असून तीव्र संताप व्यक्त केला आहे. प्राप्त झालेला निधी कुणाच्या घशात गेला? अद्याप पावतो काम पूर्ण का झाले नाही? असा प्रश्न नागरिक उपस्थित करू लागले आहेत. या गंभीर समस्या कडे विद्यमान ग्रामपंचायत कमिटीने खुद्द लक्ष केंद्रित करून स्मशानभूमीचे काम पूर्णत्वास नेऊन ही समस्या दूर करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments