चिमूर तालुका प्रतिनिधी:-
दरारा:-चिमूर जवळील नेरी पासून १५ किमी अंतरावरील काजळसर येथे गणपती विसर्जन करून ट्रॅक्टरने जात असतांना ट्रॅक्टर भर वेगात पलटल्याने १ महिला जागेवर ठार तर २५ ते ३० विद्यार्थी गंभीर जखमी त्यात १५ ते २० महिला सुद्धा गंभीर जखमी झाल्या आहेत.
यांच्यावर उप जिल्हा रुग्णालय चिमुर येथे प्रथमोपचार सुरु असून काहींना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले आहे. याबाबत घटनेची माहीती मिळताच चिमुर शहरातील खासगी डॉक्टर सुद्धा तात्काळ मदतीसाठी उपजिल्हा ररूग्णालयात दाखल झाले. चिमुर पोलीस पुढील तपास करीत आहे.
0 Comments