नांदगाव प्रतिनिधी
मुल तालुक्यातील नांदगाव कला क्रीडा साहित्य संस्कृती जोपासण्याकरिता दुसऱ्यांदा रात्र कालीन भव्य स्टार क्रिकेट क्लब च्या वतीने सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे नांदगाव येथील शितलताई राठोड आदिवासी आश्रम शाळेत दिनांक 27 10 2022 पासून नांदगाव टेनिस प्रीमियर लीगला सुरुवात होत आहे सदर क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष भाऊ धोटे यांचे हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष भाऊ रावत हे राहणार आहेत. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस कुमारी शिवानी ताई वडेटिवार तसेच नांदगावच्या सरपंच कुमारी हिमानी ताई वाकुडकर ह्या प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. सदर क्रिकेट सामन्यांचा दर्शकांनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन अभिजीत दशरथ वाकुडकर यांनी केले आहे.
0 Comments