Ticker

6/recent/ticker-posts

विसापूर येथे निर्माण होत असलेल्या अटल जैव विविधता आणि वनस्पती उद्यानाची आढावा बैठक संपन्न



ठरलेल्या वेळेत लोकार्पण करण्याचे निर्देश

मुंबई, दि. 11 ऑक्टोबर 2022 : विसापूर येथे उभे राहात असलेल्या अटल जैवविविधता व वनस्पती उद्यानाचे लेकार्पण ठरलेल्या वेळीच करण्याचे निर्देश आज संबंधित अधिकाऱ्यांना दिले. मंत्रालयात यासंदर्भात वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली.

यावेळी विसापूर येथे होणाऱ्या या जैवविविधता वनस्पती उद्यानात ज्या नवीन कल्पना राबविण्यात येत आहेत त्यांची माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे निर्मिती कामांची सद्यस्थिती आणि कालमर्यादा याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीस विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वन संरक्षक वाय एल पी राव यांच्यासह संबंधित वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments