जिवनदास गेडाम,पोंभुर्णा
चंद्रपूर मध्य चांदा वनविभातील बल्लारशा वनपरिक्षेत्रात नियतक्षेत्र सातारा कोमटी कक्ष क्र. ४३९ मध्ये वनविभागाचे अधिकारी गस्तीवर असतांना जंगलाचा राजा *वाघ* संशयास्पद मृत अवस्थेत आढल्याची गंभीर घटना पुढे आली आहे. या प्रकरणाने चंद्रपूर वनविभात मोठी खळबळ माजली आहे. यात वाघाच्या मृत्यूचे गुढ अजूनही कायम आहे. त्यामूळे वनविभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कार्यप्रणाली वर नागरिकांनी सवाल उपस्थित केला आहे.
सविस्तर वृत्तांत याप्रमाणे की, दिनांक २०.१०.२०२२ रोजी सकाळी ११.१५ वाजता बल्हारशाह वनपरिक्षेत्रा अंतर्गत नियतक्षेत्र सातारा कोमटी मधील कक्ष क्र. ४३९ मध्ये वनविभाग कर्मचारी व अधिकारी यांना सामुहीक गस्ती दरम्यान जंगलाचा राजा *वाघ* मृतावस्थेत आढळुन आला. त्यामुळे वनविभागाने त्वरीत दखल घेऊन त्याचा तपास सुरु केला. सदर वाघ हा नर असुन त्याचे वय अंदाजे ३ वर्ष इतके आहे. वाघाचे संपुर्ण अवयव सुरक्षित आहेत. वाघाचा मृतदेह करीता शवविच्छेदन डॉ.डी.पी. जांभुळे, पशुधन विकास अधिकारी, बल्लारपुर व डॉ. कुंदन पोडचलवार, पशुवैद्यकिय अधिकारी, ता. अं.व्या. प्र. चंद्रपुर यांनी श्रीमती श्वेता बोड्डु, उपवनसंरक्षक मध्य चांदा वनविभाग चंद्रपुर, तसेच बंडु धोत्रे, राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरण प्रतिनिधी, मुकेश भांदककर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांचे प्रतिनीधी व नरेश भोवरे, वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह यांचे उपस्थितीत पार पाडले. शवविच्छेदनानंतर वाघाच्या अवयवाचे नमुने घेण्यात आले. सदर नमुने परिक्षणाकरीता रासायनिक विश्लेषक, जिल्हा न्यायसहाय्यक, वैद्यकिय प्रयोगशाळा नागपुर येथे पाठविण्यात येणार आहे. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्युचे कारण सांगता येईल. असे वनविभागाने कळविले आहे.
*सदर प्रकरणी प्राथमिक वनगुन्हा नोंद*
नियतक्षेत्र सातारा कोमटी कक्ष क्र. ४३९ मध्ये वाघाचा संशयास्पद मृत्यू आढल्याने वनविभागा अंतर्गत वनगुन्हा 08952/223781/2022 नुसार जारी करण्यात आलेला आहे. मध्य चांदा वनविभागाच्या अधिकारी श्वेता बोड्ड उपवनसंरक्षक चंद्रपुर व श्रीकांत पवार सहाय्यक वनसंरक्षक (वनी व वन्य) मध्य चांदा वनविभाग चंद्रपुर यांचे मार्गदर्शनात प्रकरणाचा पुढील तपास नरेश भोवरे, वनपरिक्षेत्र अधिकारी बल्हारशाह हे करीत आहे. सदर कार्यवाही पुर्ण करण्याकरीता अब्बास पठाण, क्षेत्र सहाय्यक उमरी, वनरक्षक श्री. प्रशांत धांडे, श्रीमती ज्योती अटेल व कु. पायल शेडमाके यांनी सहकार्य केले.
0 Comments