जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
सातारा: रयत शिक्षण संस्था, सातारा येथे नुकताच *इन्फोसिस फौंडेशनच्या* अध्यक्षा सौ. सुधा मुर्ती यांचा नुकताच रुपये २.५ लाखाचा* लक्ष्मीबाई पाटील राष्र्टीय पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. सौ. सुधा मुर्तींनी त्याची परतफेड म्हणुन रु १० लाखाची* देणगी रयत शिक्षण संस्थेला अनाथ विद्यार्थ्यांसाठी दिली हा झाला मनाचा मोठेपणा..... पण सौ. सुधा मुर्ती यांच्या बाबतची आश्चर्यकारक माहीती तुम्हाला माहीत आहे हे का ?
सुधा मुर्ती ह्या प्रसिध्द अशा १०,००० कोटी चा व्याप असलेल्या इन्फोसिस फौंडेशनच्या अध्यक्षा असुन दरवर्षी त्या १०० कोटी पेक्षा जास्त रक्कम देणगी म्हणून दान करतात. तरीही अतिशय साधी राहणी ठेवण्याकडे त्यांचा *खास कटाक्ष असतो... सुधा मुर्ती नेहमी ज्या साड्या घालतात त्या साड्या कमी किंमतीच्या असतात.
पर्स २०० ते ४०० रुपयाची असते. मनगटी घड्याळ वेळ बघता आली म्हणजे फार झाले म्हणून घड्याळही साधे सुधे ८००—९०० रुपयाचे असते. मोबाईल ७ ते ८ हजाराचा.
फेसबुक, व्हाटसअप मध्ये १५—१५ दिवस लक्ष घालत नाही. पायातील चप्पल सुध्दा महागडी नसते. कोणत्याही ब्रॅन्डेड वस्तु वापरत नाही. घरातील सर्व कामे स्वत:च करतात. नातेवाईक व मित्रपरिवार यांचे घरातील सर्व लग्न व दु:खद प्रसंगी हजर राहतात.
लाख- दिड लाख महीना कमवणार्या माणसांच्या बायका एखाद्या लग्नात अंगावर दागिने , महागड्या साड्या घालून इतरांना तुच्छ लेखत हाय-फाय राहणीमानात स्वत:ला मिरवत असतात पण सौ. सुधा मुर्तींचा तिथे प्रवेश झाल्यावर* तेथील अहंकारी नजरा क्षणार्धात लाजेने खाली झुकतात..
हजारो कोटीची सम्राज्ञी असलेल्या *सुधा मुर्तींचा* साध्या राहणीमानातला तेथील वावर सर्वांना अचंबित करुन सोडतो, आपण कोण आहे हे विसरुन *इतरांना मोठेपणा* देत ही बाई जेव्हा सर्वांची स्वत:हून पुढे जाऊन आस्थेने चौकशी करु लागते तेव्हा मी मी म्हणणार्यांचा अहंकार क्षणार्धात गळून पडतो..
0 Comments