नागपूर:आज नागपूर येथे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस वतीने मा. महेबुब भाई शेख यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवास स्थानावर निषेध मोर्चा काढून तीव्र निर्दशने करण्यात आली.
मागील दोन महिन्यामध्ये खोके सरकार आल्यापासून महाराष्ट्र राज्यातून जवळपास चार मोठे उद्योग गुजरातला पळविण्यात आले आहेत. वेदांत फॉक्सकॉन, नागपूर मिहानमध्ये होणारा टाटा एअरबसचा प्रकल्प गेला.
यावरुन हे सरकार गुजरातला उद्योगाचे आंदण देतंय आणि महाराष्ट्र राज्यातील तरुणांच्या हातात बेरोजगारीचा कटोरा देत आहे. त्याच्या निषेधार्थ आज नागपूर येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने देवेंद्र फडणवीस यांच्या घरावर निषेध मोर्चा काढून तीव्र निदर्शने करण्यात आली.
0 Comments