जिल्हा संपादक | रुपेश निमसरकार
चंद्रपूर जिल्ह्यात कांग्रेस पक्षाने संपूर्ण तालुक्यात तत्कालीन तालुका अध्यक्षांना पायउतार करीत पक्षाला नवीन उर्जा देणारे कार्यकर्ते यांना संधी देत तालुका अध्यक्ष पदावर विराजमान केले आहे. यात पोंभुर्णा तालुक्यात सुद्धा तत्कालीन मंत्र्याच्या मामा ला डच्चू देत अनेक वर्षापासून पक्षाशी एकनिष्ठ राहून सर्वसमावेशक कार्य करणारे सोसायटी च्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय देणारे रवी मरपल्लीवार (अण्णा) यांची तालुका अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे.
या बदलाने पोंभुर्णा तालुक्यात कांग्रेस कार्यकर्त्यात आंनदाचे वातावरण निर्माण झाले असून नवचैतन्य पसरले आहे.
तत्कालीन मंत्री वडेट्टीवार असताना त्यांच्या अंत्यत जवळचे व रिश्तेदार(मामा) म्हणून ओळख असणारे कवडूजी कुंदावार यांची पोंभुर्णा तालुका अध्यक्ष म्हणून निवड केली होती. परंतु त्यांच्या कार्यकाळात व नेतृत्वात नुकत्याच झालेल्या नगरपंचायत व ग्रामपंचायत निवडणुकीत कांग्रेस पक्षाची मोठी पिछेहाट झाली. व नगरपंचायत मध्ये केवळ एक सिट जिकंण्यात समाधान मानावे लागले.
पोंभुर्णा तालुक्यात व शहरात कांग्रेस पक्षाचे मोठे जाळे असतांना पक्षातीलच नेतृत्वाच्या वादात कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यात मोठा आपसी मतभेद पाहायला मिळाला होता. याचाच फायदा नगरपंचायत व ग्रामपंचायत निवडणुकीत राजकारणात नव्याने उडी घेणाऱ्या शिवसेना पक्षाला झाला. हे चित्र जगजाहीर आहे. त्यामुळे याचीच मिमांसा व चितंन कांग्रेस पक्षाच्या वरिष्ठांकडून केले गेले की काय ? मात्र तालुका अध्यक्ष पदावर फेरबदल करीत वरिष्ठांनी कवडू कुंदावार यांना डच्चू देत सर्वसामान्य माणसांशी नाळ जुळवून असलेल्या व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी सलोखा ठेवणाऱ्या एका सच्या कार्यकर्त्याला संधी देत अन्याय, अत्याचार विरोधात बच्चूभाऊ सारखी रोखठोक भुमिका घेणाऱ्या रवी मरपल्लीवार (अण्णा) यांना तालुका अध्यक्ष पदावर नियुक्ती केली आहे.
या नियुक्ती ने पोंभुर्णा तालुक्यात कांग्रेस पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यात मोठे नवचैतन्य व आनंद निर्माण झाला आहे. या निवडीने कांग्रेस पक्षाच्या वरिष्ठांचे आभार मानले जात असून पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा दिल्या जात आहेत.
0 Comments