शाळा व्यवस्थापन समिती गठित अध्यक्ष नरेश मडावी तर पत्रकार योगेश्वर शेंडे यांची उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड
नागभीड तालुक्यातील येनोली माल येथील शाळा व्यवस्थापन समिती गठित
नागभिड तालुका प्रतिनिधी
नागभीड - - नागभीड तालुक्यातील येनोली माल येथील नवीन शैक्षणिक सत्र २०२२- २३ आणि २०२३ - २०२४ या दोन वर्षा साठी नवीन शाळा समिती गठित करण्यात आली.
मागील शाळा समितीचा कार्यकाळ संपल्याने दि.६ ऑक्टो. नवीन समिती गठित करण्यात आली आणि दि ८ ऑक्टो.रोजी अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी निवडी बाबत सभा आयोजित करण्यात आली होती. त्यात अध्यक्षपदी नरेश मडावी व उपाध्यक्ष योगेश्वर शेंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
नवनियुक्त अध्यक्ष यांचे पुष्पगुच्छ देऊन शाळेतील मुख्याध्यापक मा, फुलझेले यांनी सत्कार केले तर उपाध्यक्ष योगेश्वर शेंडे यांचे स्वागत शिक्षीका दोडके यांनी केले व सर्व नवनियुक्त सदस्य तथा अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे शब्दसुमानाने शाळेतील शिक्षक मा, कंदिकुरवार यांनी स्वागत केले.
यावेळी नवनियुक्त शाळा व्यवस्थापन समिती चे सदस्य विलास ठिकरे, उद्धव सोनवाणे, निरंजन शास्त्रकार,आम्रपली रामटेके,सुष्मा आत्राम, साधना आत्राम, शालू भाकरे, संगीता नेवारे, शाळेचे सर्व शिक्षक उपस्थित होते.
0 Comments