आयोजित या स्पर्धेचा मान्यवरांच्या उपस्थितीत विधीवत उद्घाटन सोहळा पार पडल्या नंतर नृत्य स्पर्धेला उत्साहपूर्वक वातावरणात सुरुवात झाली.या वेळी कामगार कल्याण अधिकारी रामेश्वर अळणे ,सेवानिवृत्त शिक्षिका मंगला वैरागडे, निल बिनकर ,कमल वर्मा भुवनेश्वरी गोपनवार , सुरेश इटनकर ,दौलत गोरे ,छाया गिरडकर ,सविता वरखेडकर ,सुषमा ढाले ,समिक्षा सरुडकर , रोशनी कांबळे उपस्थित होते.दरम्यान पार पडलेल्या या नृत्य स्पर्धेत विदर्भातील चंद्रपूर ,वर्धा , गडचिरोली आदीं जिल्ह्यातील (टीमच्या) नृत्य कलावंतांनी आपला सहभाग नोंदविला होता.एकाहुन एक सरस नृत्य या स्पर्धेत रसिकांना बघावयास मिळाले .
उपस्थित प्रेक्षकांनी ही टाळ्यांचे कडकडाटात या वेळी कलावंतांचे कौतुक केले.स्थानिक स्री शक्ती महिला आघाडीच्या कलावंतांनी आज या स्पर्धेत भाग घेवून लक्षवेधक नृत्य सादर केले.त्यांच्या टीमची स्पर्धेत भाग घेण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे टीमच्या संयोजिकांनी या वेळी सांगितले.सामाजिक कार्यात ही महिला आघाडी नेहमीच अग्रेसर असते. हे विशेष!या नृत्य स्पर्धेचे परीक्षक म्हणून भुवनेश्वरी गोपनवार,कमल वर्मा व निल बिनकर यांनी उत्तमरित्या काम बघितले . कार्यक्रमाला रसिक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता
.
0 Comments