सुमारे सातशे वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वर महाराजांनी मंत्रात कोणतीही शक्ती नसल्याचे मत आपल्या ओवीमधून सांगितले आहे. तरीही समाजात मंत्र-तंत्र, जादूटोणा या विषयीची भीती घर करून बसली आहे.
मंत्राने कोणालाही मारता येत नाही; कोणीही जादूटोणा करू शकत नाही. जो कोणी मांत्रिक आमच्या कार्यकर्त्याला केवळ मंत्राने मारेल त्याला अभाअंनिसचे पंचवीस लाख रुपयांचे बक्षीस आहे;असे आव्हान अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक हरिभाऊ पाथोडे यांनी केले. ते पोलिस स्टेशन, पौंभुर्णा व ग्राम पंचायत, देवाडा खूर्द च्या वतीने देवाडा खूर्द, तालुका पौंभुर्णा येथे आयोजित 'चमत्कारा मागिल विज्ञान' व 'जादुटोणा विरोधी कायदा' या विषयावरील प्रबोधनात्मक कार्यक्रमात मार्गदर्शन करताना बोलत होते. त्यांनी मंत्र-तंत्र, भूत, भानामती, स्वर्ग, नरक इत्यादी मानवी कल्पना असल्याचे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाच्याअध्यक्ष स्थानी ग्राम पंचायत देवाडा खूर्द चे सरपंच विलास मोगरकार हे होते.
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून जाम तुकूमचे सरपंच भालचंद्र बोधलकर, अभाअंनिस, जिल्हा चंद्रपूर चे सहसचिव अनिल लोनबले, अभाअंनिस तालुका पौंभुर्णाचे उपाध्यक्ष महेंद्र शेडमाके,पत्रकार सुरज गोरंतवार हे प्रामुख्याने उपस्थित होते. अभाअंनिसचे चंद्रपूर जिल्हा संघटक यांनी समितीची भूमिका व जादुटोणा विरोधी कायदा याविषयीचे मार्गदर्शन केले.
अभाअंनिसचे चंद्रपूर जिल्हा सचिव यांनी चमत्कार प्रात्याक्षिकासह चमत्कारा मागील विज्ञान समजावून सांगितले.
प्रास्ताविक सहाय्यक पोलीस निरीक्षक धर्मेंद्र जोशी यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ठाकुरदास गव्हारे यांनी तर आभारप्रदर्शन ग्रामसेवक दिलीप शिंदे यांनी केले.
या कार्यक्रमाला देवाडा खूर्द येथील बहुसंख्य नागरिक, महिला, युवामित्र उपस्थित होते.
0 Comments