Ticker

6/recent/ticker-posts

उर्मट व मुजोर बस चालकावर कठोर कारवाई करा-शिवसेनेचे जीवनदास गेडाम यांची मागणी



पोंभुर्णा:एसटी महामंडळाची बस म्हणजे सर्वसामान्यांसाठी हक्काची आणि अगदी सोयीची सेवा. महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य लोकांना खेड्यापासून ते शहरापर्यंत जोडणारी एसटीची सेवा ही एक सामाजिक बांधिलकी निर्माण करणारी सेवा आहे. अनेक पाडे आणि खेड्यापासून शाळेत जाण्यासाठी विद्यार्थी वर्गासाठी हक्काचे वाहन म्हणजे आपली एसटी होय. आजारी व्यक्तींना खेड्यापासून तालुका आणि जिल्हा रुग्णालयात जाण्यासाठी हक्काचे आणि सुरक्षित प्रवासाचे वाहन म्हणजे आपली एसटी होय.मात्र काही वाहक-चालक प्रवाशांना सेवा देण्याऐवजी त्यांची किती गैरसोय करतात याचा अनुभव खुद्द शिवसेना उपतालुकाप्रमुख तथा जुनगावचे माजी सरपंच, पत्रकार जीवनदास गेडाम यांना आला. 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पोंभुर्णा ते जुनगाव ही एसटी महामंडळाची बस सकाळ संध्याकाळ येते. या बसमध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची संख्या मोठी असल्यामुळे विद्यार्थ्यांनीच ही बस खचाखच भरलेली असते. दिनांक २४ नोव्हेंबर २०२२ रोज गुरुवारी सायंकाळी पाच वाजता (एम.एच. ०७ सी - ९४०८)ही बस पोंभुर्णा वरून नांदगाव बस स्थानकावर आली. तिथून देवाडा बुद्रुक आणि जुनगाव येथील विद्यार्थ्यांनी आपापली जागा घेऊन जागा अपुरी पडल्यामुळे अनेक विद्यार्थी उभे होते. सर्वांच्या मागून जूनगावचे माजी सरपंच, शिवसेना उपतालुकाप्रमुख तथा पत्रकार जीवनदास गेडाम हे बसमध्ये चढले. आधीच विद्यार्थ्यांनी खचाखच बस भरून असल्यामुळे चालक कॅबिनमध्ये चालकाच्या डाव्या हातावर एक आसन असते त्या आसणावर जीवनदास गेडाम हे बसायला गेले असता उर्मट चालकाने तिथे बसण्यास मज्जाव केला. या बाचाबाचीत त्यांनी बस बंद करून विद्यार्थी आणि प्रवाशांना वेठीस धरण्याचा प्रकार केला. विद्यार्थी आणि प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन शेवटी जीवनदास गेडाम यांनी माघार घेऊन त्या आसनावरून उठून उभ्याने प्रवास केला.

 बस जेव्हा जुनगाव बसस्थानकालर आली तेंव्हा प्रवाशांनी याबाबत जाब विचारला असता चालकाने उरमाटपणाने उत्तर देऊन निघून गेला.

संतापलेल्या माजी सरपंचाने त्यांच्याकडे तक्रार पुस्तिका मागितली. मात्र वाहकांकडे ती उपलब्ध नव्हती. या मुजोर आणि उर्मट चालकास धडा शिकवावा. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी विद्यार्थी, प्रवासी आणि शिवसेना उपतालुका प्रमुख जीवनदास गेडाम यांनी केली आहे. याबाबत शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप भाऊ गिर्हे यांचे कडे तक्रार देऊन कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळेस दिली आहे.

https://youtu.be/WAiw1JLuMC8

Post a Comment

0 Comments