Ticker

6/recent/ticker-posts

विचारज्योत फाउंडेशन तर्फे संविधान दिन साजरा



संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन...

चंद्रपूर: '26 नोव्हेंबर' हा दिवस देशभर 'संविधान दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून विचारज्योत फाउंडेशन तर्फे चंद्रपूर येथे संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून करण्यात आली. त्यानंतर उपस्थित सर्वांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करून संविधानाच्या रक्षणासाठी कटिबद्ध राहू अशी प्रतिज्ञा घेतली. याप्रसंगी इंजि. नरेंद्र डोंगरे यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी विचारज्योत फाऊंडेशनचे सुरज पी दहागावकर, मुन्ना तावाडे, इंजी. नरेंद्र डोंगरे, सारंग चालखुरे, शिवाजी गोरघाटे, विजय कांबळे, स्वप्नील निमगडे, एस बी खोब्रागडे, मिलिंद रामटेके, आशिष दहागावकर, आशिष अलोने, संघदिप मुंजनकर, प्रज्योत उराडे, प्रणाली दहागावकर, सृष्टी मुगलवार यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून संविधान दिन यशस्वी केला...

Post a Comment

0 Comments