Ticker

6/recent/ticker-posts

जागतिक पत्रकार दीना निमित्ताने लिहिलेले पत्रकारिताचे वास्तव:



आज पत्रकार दिवस मीडियातील सर्व पत्रकार बंधूंना शुभेच्छा

मित्रांनो, आजकाल पत्रकारिता करणे फारच कठीण काम झाले आहे.कारण ज्याची बातमी दिली व ज्याचा विषय मांडला तो प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे शत्रू होतो व आपल्यावर डुख-डाव धरून राहतो.वेळप्रसंगी तो आपली चूक शोधत राहतो‌ व खोटानाटा कोणताही गुन्हा टाकण्याचा तो प्रयत्न करतो. काही राजकीय लोक तर नेहमीच आमच्या मागे जाळे लावलेला तयारच असतात.कारण मीडियातील 50 टक्के बातम्या या राजकारणावर असतात व नेत्यांच्या आर्थिक लफड्यांवरच असतात. म्हणून 90% पत्रकार हे केवळ सामान्य बातम्या देऊन मोकळे होतात. जोखमीची बातमी कोणताही पत्रकार सहसा टाळत असतो. म्हणून अतिशय दोन-चार पत्रकारच मोठ्या हिमतीने लिहीत असतात, व्हिडिओ टाकत असतात व शोध पत्रकारिता करून बातम्या देत असतात.

बातमीमुळे आमची बदनामी झाली. आमच्याकडून खंडणी मागितली. पेड न्युज दिली. 

आमच्याकडून पैसे मागितले. 

विरोधकांनी आमच्या मागे तुम्हाला आर्थिक सुपारी देऊन लावले आहे तुम्ही अमुक अमुक पक्षाचीच व मी त्याचीच बाजू घेऊन बातमी देऊन तो लेख लिहितात. हे क्षेत्र असं आहे की उत्पन्न शून्य,पण शत्रुत्व मात्र शंभर टक्के असते. कोळशाची दलाली व हात काळे.

कशीही बातमी द्या.कसाही लेख द्या त्याच्यातून क्षीरनीर पद्धतीने अर्थ काढलाच जातो.

देशातील व समाजातील सर्वच व्यवस्थां या खुप भ्रष्ट व अनैतिक झालेल्या असून,तरीसुद्धा पत्रकारांकडून इमानदारीची व सत्याची अपेक्षा केली जाते.आम्ही पत्रकारांनी अत्यंत सत्य व वास्तव लिहायला व दाखवायला सुरुवात केली तर हजारो जेल नवीन बांधाव्या लागतील.

आमचा मीडिया बऱ्याच प्रमाणात डोळ्यावर कातडी घेतो.जर डोळ्यावर कातडी घेतली नाही तर आमचाच डोळा व कॅमेरा फुटण्याची पाळी येईल.संपूर्ण आकाश फाटलेले आहे तर त्याला कोणता टेलर ठिगळ लावून शिवून देईल.पत्रकाराने कितीही इमानदारीने बातमी दिली,पण वर्तमानपत्राच्या व चॅनेलच्या संपादकांनी ती बातमी दाखवलीच नाही व छापलीच नाही तर इमानदार व अभ्यासू पत्रकार काहीही करू शकत नाहीत. चावडीवरच दरोडा पाडला जातो,त्यामुळे चावडीवरचा पाटील फरार होतो. चावडीवरचा पाटीलच फरार झाला तर गाव आपोआप हतबल होते.म्हणजे गावाचा पाटील कणखर असला पाहिजे.

मीडिया थोडाफार इमानदारीने काम करत आहे,म्हणून जनतेला थोडेफार न्याय मिळत असतो, बातम्या मिळत असतात व दडलेली माहिती मिळत असते.

पुन्हा एक वार पत्रकार दिनाच्या शुभेच्छा धन्यवाद !!

जगदीश का. काशिकर,
 कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

Post a Comment

0 Comments