चंद्रपूर- किरण घाटे-
चंद्रपुर जिल्ह्यातील सर्व पुलांचे ऑडिट करा अश्या आशयाची मागणी उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी आज केली आहे.रविवारी बल्लारपूर येथील रेल्वे पादचारी पूल कोसळून मोठी दुर्घटना झाली.या पुलाच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील रेल्वे पुलांसह राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील सर्व पुलांचे ऑडिट करावे या शिवाय जिल्ह्यातील अन्यही पुलांच्या निर्मितीचे काम करून उत्तम दर्जाचे पूल निर्माण करावे अशी मागणी झोडे यांनी केली.
चंद्रपुर शहरातून मध्य रेल्वेची वर्धा - बल्लारशहा रेल्वे लाॅईन चंद्रपूर शहराला दोन भागात विभागून जाते. या लाॅईनवर प्रियदर्शनी चौक ते चंद्रपूर बस स्थानक असून सदरहु मार्गावरील बस स्थानकाजवळ सन 1982-83 दरम्यान दुपदरी रेल्वे उड्डाण पूलाचे बांधकाम करण्यात आले.दरम्यान या पुलावर भेगा पडल्या असून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत.तर वरोरा नाका उड्डाणपूलावर सुद्धा खड्डे पडले असून संबंधित विभागाने खड्डे बुजवावे व पुलाची डागडुजी करावी अशी मागणी झोडे यांनी एका प्रसिध्दी पत्रकातून केली आहे.
राजुरा रेल्वे क्रॉसिंग वरील पुलाची व वर्धा नदीवरील पुलाचे सुद्धा स्ट्रॅक्चरल ऑडीट करावे अशी सुद्धा राजू झोडे यांनी आज या प्रतिनिधीशी बोलताना मागणी केली आहे.
0 Comments