गडचिरोली (वडसा )
मनाचा मोठेपणा हा व्यक्तीच्या चांगल्या कामाचे कौतुक करण्यासाठी माणुस तेवढ्याच दिलदार आणि मोठ्या मनाचा असावा लागतो. परंतु गडचिरोलीतील मुकुंद जोशी सारखे ब्लॉकमेलर लोकं स्वार्थासाठी दुसऱ्यांच्या चांगल्या कामात अडचणी निर्माण करण्याचा विचार करून कटकारस्थान करतात. हे नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेतुन प्रसिद्ध झालेल्या बातम्या वरून स्पष्ट होते. चांगल्याप्रकारे काम करतात त्यांच्या भावनांची कदर केली तरच अधिक समाधान मिळेल .दुसऱ्यांच्या चांगल्या कामांचा , रात्रंदिवस मेहनतीने यशस्वी होण्यासाठी धडपड करणाऱ्या व्यक्तींचा योग्य पध्दतीने विचार करण्याच्या वृत्तीने आयुष्य चांगले होते. नाही तर “ जो स्वतः च्या स्वार्थासाठी मुकुंद जोशी सारखी मुजोरी करून, पैशाच्या हव्यासापोटी हेतुपुरस्सर दुसऱ्यांसाठी खड्डे खोदतो तो एक ना एक दिवस खड्यात जातो.”
स्वार्थासाठी मुकुंद जोशी मनात कपट ठेवून दुसऱ्याची पर्वा करीत नाही. आणि समंजसपणाची भरपाई पैशाने करु पहाणारा आहे हे नुकत्याच हाती लागलेल्या क्लिप वरुन स्पष्ट होते , मुकुंद जोशी यांनी दोन करोड रुपये मिळावे यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात माहितीचे अधिकारान्वये अनेक पत्र दिले आहे. नेहमी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कार्यालयात बसून आणि गोडीगुलाबीने माहिती काढुन माहिती अधिकारान्वये माहिती मागीतली आहे. सामाजिक जिवन जगत असतांना पैश्यापेक्षा समंजसपणा असणे फार महत्वाचे असते . कारण समंजसपणा हा खऱ्या सुसंवादाचा पाया असतो. परंतु मुकुंद जोशी सारखे लोक सुसंगत आणि सुसंवादासाठी पात्र नाहीत असे परखड मत भीम टायगर सेनेचे वडसा तालुकाध्यक्ष अंगराज शेंडे यांनी आमच्या प्रतिनिधींशी चर्चा करीत असताना व्यक्त केले.
मुकुंद जोशी यांनी आपल्यामुळे कोणालाही कुठलाही त्रास होणार नाही याची जास्त काळजी घ्यावी. त्याप्रमाणे माणुसकीने वागायला सुरुवात करावी., एकमेकांना धीर द्यावा त्यांना आधार द्यावा, त्यांना साथ द्यावी, आतापर्यंत असलेल्या मैत्रीत,, प्रेमात गळा कापण्याचे षडयंत्र मुजोरांनी करू नये. सरकारी नियमांचे व सुचनांचे प्रामाणीकपणे व काटेकोर पालन करावे, प्रशासकीय कामात सरकारला सहकार्य करावे. खोट्या राजकारणी लोकांच्या अफवापासून दूर व सावध राहावे. प्रत्येकाने प्रथम स्वतःचा विचार करावा. स्वार्थासाठी कपटाने वागणाऱ्या मुकुंद जोशी पासून शासन , प्रशासनाने सावध राहावे.
जागृत राहावे, सतर्क राहावे. माहिती अधिकार कायद्याचा दुरूपयोग करण्याचे प्रकार खूप वाढले असून अधिकाऱ्यांना सातत्याने ब्लॅकमेल केले जात आहे. त्यामुळे अशा वादग्रस्त माहिती अधिकार कार्यकर्ते आणि ब्लॅकमेलर्सचा शोध घेऊन पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करणारी लक्षवेधी सूचना आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत मांडली आहे. राज्य सरकारने अशा प्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठी विशेष धोरण तयार करावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
शासन , प्रशासकीय अधिकारी यांनी घेतलेल्या धोरणात्मक निर्णयामुळे गडचिरोली जिल्ह्यातील विकासकामे झपाट्याने होत असताना, दुसरीकडे या विकासकामां बाबत मुकुंद जोशी सारखे तथाकथित स्वयंचलित आणि पडद्याआड काम करणारे ब्लॉकमेलर कार्यकर्ते जाणीवपूर्वक माहिती अधिकार कायद्यान्वये माहिती मागवतात आणि त्याआधारे तक्रारी करून विकासासाठी अग्रेसर असणाऱ्या अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करतात. त्यांच्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य विषयक विकासकामां मध्ये अडथळे निर्माण होत असल्याचे सरनाईक यांनी लक्षवेधी सूचनेत नमूद केले आहे. सदर माहिती भिम टायगर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली जिल्ह्यातील वडसा तालुक्याध्यक्ष शेंडे यांनी निदर्शनास आणून दिली.
या कार्यकर्त्यांमध्ये खरोखरच काही प्रामाणिक, दक्ष नागरिक असतात. काळ्या यादीत टाकलेल्या व चुकीची कामे करणाऱ्या ठेकेदारांची माहिती मागविणे हा त्यांचा अधिकार आहे. मात्र, मुकुंद जोशी सारखे कार्यकर्ते वारंवार अर्ज करून मिळालेल्या माहितीचा अर्धवटपणे स्वतःच्या मर्जीप्रमाणे अर्थ लावून असंख्य तक्रारी करून संशयाचे वातावरण निर्माण करतात. खोट्या तक्रार अर्जांमुळे सामान्य नागरिकांच्या योग्य त्या तक्रारी व कामे पार पाडणे प्रशासकीय अधिका-यांना अवघड जाते. आपले इप्सित साध्य झाल्यानंतर अचानक तक्रार मागे घेत असल्याचे लेखी पत्रही संबंधित विभागाला देतात. त्यात केलेली कारवाई योग्य असल्याचेही सांगतात. मुकुंद जोशी यांचे जिल्हा सामान्य रुग्णालयात येऊन तासनतास बसण्याचे वर्तन फारच संशयास्पद असून अशा समाजकंटकांवर, ब्लॅकमेलर वर उचित कारवाई होणे गरजेचे असल्याचे मत भिम टायगर सेनेचे तालुकाध्यक्ष अंगराज यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्य मंत्री, आरोग्य संचालक आरोग्य सेवा संचालनालय मुंबई , आरोग्य उपसंचालक नागपूर विभाग नागपूर यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.
काही वादग्रस्त आरटीआय कार्यकर्त्यां संदर्भात संशय निर्माण झाल्यानंतर वादग्रस्त पद्धतीने काम करणाऱ्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांची माहिती संकलित करण्याचे अधिकार गडचिरोली जिल्ह्यातील वडसा तालुकाध्यक्ष अंगराज शेंडे यांचेकडे राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके यांनी सोपविली आहे आणि ती माहिती पोलिसांकडे लवकरच दिली जाणार असून त्यानंतर सखोल चौकशी होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
0 Comments