विजय जाधव
मुल तालुका प्रतिनिधी
मुल तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायत मध्ये कार्यरत कर्मचारी सागर दुर्योधन चलाख वय 31 वर्ष यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
हे दुःखद बातमी परिसरात नांदगाव आणि परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने गावात एक दिवसाचा दुखावटा पाळण्यात आला. सागरच्या अचानक जाण्याने गाव शोक सागरात बुडाला. सागरच्या जाण्याने अपरिमित अपरिमित हानी झाली असून न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी अनेक मान्यवर, व नातेईक मित्र व मंडळी शेकडोच्या संख्येने उपस्थित झाले होते.
त्यांचा दोन वर्षांपूर्वीच विवाह झाला होता. गावातील तरुण मुलगा अंतरल्यामुळे मित्रमंडळी सुद्धा शोक संवेदना व्यक्त करीत आहेत. त्याच्या आत्म्याला शांती लाभो आणि कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो अशी शोक संवेदना पत्रकार संघातर्फे करण्यात आली आहे.
त्यांच्या पश्चात म्हातारे आई-वडील, पत्नी बाई एक बहीण, असा आप्त परिवार आहे. त्यांचेवर वैनगंगा नदी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
0 Comments