पोंभुर्णा (उमरी पोतदार) : यु. पी. योद्धा उमरी पोतदार यांच्या विद्यमाने कबड्डी खेळाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा कब्बडी हा खेळ उमरी पोतदार येथे घेत आहेत. या खेळाच्या निमित्ताने ग्रामीण भागातील कब्बडी खेळाडू आपली कला, खुषलता दाखवीत यामध्ये हिरीहिरीणे सहभाग नोंदवून कब्बडी खेळण्याचा आनंद घेत असतात. यावर्षी सुद्धा सर्व खेळाडू आनंदाची बातमी आहे. यू. पी. योद्धा उमरी पोतदार येथे दिनांक ०६, ०७, ०८ जानेवारी २०२३ रोजी अनिल पाटील यांच्या भव्य पटांगणावर कबड्डी खेळाचे आयोजित केलेला आहे.
यावेळी यू. पी. योद्धा टीमच्या सदस्यांनी सर्व खेळाडूंना आग्रहाची विनंती करीत आहे की, मोठ्या संख्येने कब्बडी खेळाचा आनंद घ्यावा आणि पारितोषिक पटकावून आपला नाव रोशन करावे असे खेळाडूंना विनंती करीत आहे. कब्बडी खेळाचे उद्घाटन मा. श्री. बाळूभाऊ धानोरकर खासदार, चंद्रपूर - वनी - आर्णी लोकसभा क्षेत्र, सह उद्घाटक मा. श्री. विनोद भाऊ अहिरकर माजी उपाध्यक्ष जि.प. चंद्रपूर, अध्यक्ष मा. श्री. विलासभाऊ मोगरकर सरपंच ग्रा. पं. देवाडा खुर्द, मा. सौ. थामेश्वरी लेनगुरे ग्रा. पं. उमरी पोतदार, मा. श्री. पठाण साहेब वनपरिक्षेत्रक क्षेत्र सहा. मा. श्री. रविभाऊ मरपल्लिवार यांच्या हस्ते सदर खेळाचे उद्घाटन होणार आहे. तरी सर्व खेळाडू जास्त संख्येने आपला सहभाग नोंदवून या कबड्डी खेळाला सहभाग करतील अशी सर्व खेळाडूंना आग्रहाचे विनंती आहे.
0 Comments