Ticker

6/recent/ticker-posts

ग्रामपंचायत कोटगांवच्या वतीने आरोग्य शिबीर



अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी

                नागभीडः नागभीड तालुक्यातील कोटगांव येथे आज दि.१२/१२/२०२२ ला आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे आयोजन १५ व्या वित्त आयोगातुन करण्यात आले. या पुर्विही खास महीलासाठी आरोग्य शिबिर घेण्यात आले होते. त्यानंतर रक्तदान शिबिर घेण्यात आले होते. कोटगांव येथील ग्रामपंचायत नवनवीन उपक्रम राबवित असते. आजच्या शिबिराचे ऊद्घाटन कृषक विद्यालयाच्या मुख्याधापीका मरगळे यांनी केले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रा.प.चे उपसरपंच यांनी भुषविले होते. यावेळी मंचावर मार्गदर्शक म्हणून डाँ.काटेखाये मँडम , आरोग्य अधिकारी धारणे, डाँ.मेश्राम , डाँ.बांडेबुचे मँडम,गटप्रवतक लाडे मँडम, ग्रा.प.चे उपसरपंच यशवंत भेंडारकर, ग्रामसेविका वैशाली ढोरे, ग्रा.प. सदस्य आनंद जांभुळे, विलास दोनोडे, पञकार आनंद मेश्राम उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात कर्मयोगी संत गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले. मार्गदर्शक डाँ. काटेखाये म्हणाल्या की,गावात रोगी राहु नये हा आमचा उद्देश आहे. घरात जर एकादा रोगी असला तर शारीरीक, मानसीक, आर्थिक नुकसान होत असते. त्या साठी आपण पुढे येऊन स्वताची तपासणी करुन घ्यावी.रोजच्या आहारात भालेभाज्या वापराव्या. ज्यामुळे आपल्याला भरपुर प्रमाणात विटामीन मिळेल. अनेकांना बि.पी. व शुगर निघत आहे. त्यामुळे खर्रा, घुटका,बिडी, शीगार यांचे सेवन टाळावे. धुम्रपान शरीरासाठी घातक आहे. तसेच महीलांनी सुद्धा काळजी घ्यावी. महीला सुद्धा खर्रा व नशिले मंजननी तोंड घासतात. त्यासाठी त्यांनीही स्वातःची काळजी घ्यावी. लहान मुले कोटगेटने ब्रश करतात. त्यावेळी मुलं पेस्ट गोड असल्याने खातात. त्यामुळे पालकांनी काळजी घ्यावी.आपले आरोग्य आपल्याच हातात आहे.त्यामुळे स्वस्थ रहा मस्त रहा असा मोलाचा संदेश दिला. यावेळी मंचावरुन यशवंत भेंडारकर, विलास दोनोडे, धारणे आरोग्य अधिकारी यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक व आभार वैशाली ढोरे ग्रामसेविका यांनी केले. शिबिरात १९० जनांनी तपासणी करुन औषधोपचार देण्यात आली. शिबिरात प्राथमिक आरोग्य केंद्र नवेगांव पांडव व उपकेंद्र कोटगांव येथील कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवीला होता.

Post a Comment

0 Comments