नागपूर / प्रतिनिधी दि. 1/1/2023:-
बोथा ता.महागाव येथे 5 घरे असलेल्या बौद्ध समाजाची महिला संरपंच झाल्यामुळे जातीय भावनेतून सर्व ग्राम पंचायत सदस्य बौद्ध महीला संरपंच यांचा सतत अपमान करणे , कुटुंबाला जीव मारण्याची धमकी देणे , कामात हस्तक्षेप करणे , राजीनामा दे म्हणून सांगणे , सगळ्या परिवाराचा खून करण्या ची धमकी देणे, जातिवाचक शिवीगाळ करत असल्या मुळे आरोपीवर अट्रोसिटी अक्टनुसार गुन्हा दाखल झाला असून आरोपीला आत्तापर्यंत अटक झाली नाही.
त्यामुळे भीम टायगर सेना प्रमुख दादासाहेब शेळके व जेष्ठ कायदे तज्ञ एड.पि.एल. नवसागरे वंचित आघाडीचे तालुकाध्यक्ष संतोष जोगदंड ज्येष्ठ पत्रकार तथा भिम टायगर शहर अध्यक्ष सिद्धूभाऊ दिवेकर भिम टायगर सेना सेना तालुकाप्रमुख कैलासदादा कदम पप्पुभाउ कावळे,विजय लहाने डि.एन.मनवर आदिनी खंडागळे कुटुंबाची भेट घेतली यावेळी आरोपीला तात्काळ अटक करा अन्यथा भिम टायगर सेना व वंचित आघाडीच्या वतीने पोलीस स्टेशनवर मोर्चा काढणार असल्याचे दादासाहेब शेळके यांनी सांगितले.
0 Comments