Ticker

6/recent/ticker-posts

_थुटरा ग्रा. पं. हद्दीत येणार खड्डा ठरतोय लहान मुलांसाठी घातक जीव घेण्याचा ठिकाण



अनिल आत्राम/गडचांदुर प्रतिनिधी ;

कोरपना तालुक्यातील गडचांदूर जवळील थुटरा ग्रा. पं. हद्दीतील तो खड्डा ठरतोय लहान मुलांसाठी जीवघेणा : खड्डा बुजविण्याची मागणी गावातील ग्रामस्थांनी केली.


आतापर्यंत १० निष्पाप मुलांचा बळी
गडचांदूर थुटरा ग्रामपंचायत हद्दीतील ढुमने ले-आउटआऊट परिसरात अंबुजा सिमेंट कंपनीची हद्द आहे. त्या हद्दीमध्ये मोठा खड्डा असून वर्षभर तेथे पाणी जमा असते. 


आजपर्यंत १० निष्पाप मुलांचा जीव या खड्डयात बुडून गेलेला आहे.
हरिगंगा सिमेंट कंपनी असताना त्यांनी चुनखडी उत्खनन केल्याने त्या नागरिकांसाठी धोकादायक असलेला हाच तो खड्डा. ठिकाणी मोठा खड्डा पडला. अंदाजे १० एकर विस्तार असलेल्या या तत्कालीन माईन्समधून मोठ्या प्रमाणात चुनखडी काढण्यात आली. 



पुढे हरिगंगा सिमेंट कंपनी बंद झाली. २००३ दरम्यान ही जागा अंबुजा सिमेंट कंपनीने अधिग्रहित केली आणि जवळच आपली मुख्य माईन्स स्थापित केली. तेव्हापासून खड्डा तसाच आहे. हरिगंगा सिमेंट कंपनीने तो खड्डा बुजविला नाही व आता असणाऱ्या अंबुजा सिमेंट कंपनीने त्याकडे लक्ष दिले नाही. 


कंपनीने आपल्या हद्दीमध्ये तारेचे कुंपण केले आहे. परंतु, त्या ठिकाणी जाण्याकरिता बरेच रस्ते असून
[चुनकी संतोष केवट, मृतक मुलाचीआई]
पंधरा दिवसांपूर्वी माझ्या १६ वर्षाच्या मुलाचा खड्ड्यात पडून मृत्यू झाला. यापूर्वी नऊजणांचा जीव गेला. खड्डा गावाजवळ असल्यान धोकादायक आहे. तो खड्डा ताबडतोब बुजवून टाकावा. जेणेकरून माझ्या मुलासारखा दुसऱ्या कोणांच्या मुलाचा जीव जाऊ नये. अशी मागणी मृतकाच्या आई-वडिलांनी केली.





काही दिवसाअगोदर दुमने ले-आऊट येथे रहिवासी असलेल्या अमन संतोष केवट या वर्ग १० वी मध्ये शिकत असलेला,विद्यार्थ्यांचा खड्ड्यात पडून मृत्यू झाला. गेल्या ३० वर्षांहून अधिक काळात या जीवघेण्या खड्ड्याने १० लोकांचे जीव घेतले आहेत. नियमानुसार उत्खनन केल्यावर निर्माण झालेला खड्डा बुजविणे संबंधित शक्य आहे. मात्र याच परिसरात अंबुजा सिमेंट कंपनीची मुख्य खदान असून ओव्हरबर्डनचे मोठे ढीग लागलेले आहेत. त्यातून हा जीवघेणा खड्डा बुजविणे कंपनीला सहज शक्य आहे. मात्र याकडे अंबुजा सिमेंट कंपनी प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. तर गावातील नागरिकांनी मदत तरी कुणाकडे मागावी हा गंभीर प्रश्न निर्माण झाले.प्रशासनाने यावर योग्य पाऊल किंवा उपायायोजना राबली नाही तर येणाऱ्या काळात असंख्य निष्पाप मुलांची जीव जाऊ शकतो. यांची चिंता नागरिकांना वाटत आहे..

Post a Comment

0 Comments