Ticker

6/recent/ticker-posts

पोंभुर्णा तालुका पत्रकार संघाच्या वतीने बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती पत्रकार दिन म्हणून साजरी




मराठी पत्रकार सृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती पत्रकार दिन म्हणून पत्रकार भावनांच्या कार्यालयात आज दिनांक 3 जानेवारी 2023 रोज शुक्रवारला पत्रकार भावनात साजरी करण्यात आली.

बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून दैनिक महासागर चे तालुका प्रतिनिधी तथा माजी सरपंच बबन भाऊ गोरंतवार हे होते. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून शिवसेना तालुका प्रमुख तथा नगरपंचायत विरोधी गटनेता आशिष भाऊ कावटवार हे होते. प्रमुख अतिथी म्हणून दैनिक पुण्यनगरी चे तालुका प्रतिनिधी नीलकंठ भाऊ ठाकरे, दैनिक लोकमतचे तालुका प्रतिनिधी सुरज गोरंतवार, दैनिक नागपूर पोस्ट, तथा दैनिक सुपर भारत, आणि चंद्रपूर समाचार चे तालुका प्रतिनिधी जीवनदास गेडाम, दैनिक भास्कर चे तालुका प्रतिनिधी पंकज वडेट्टीवार, पत्रकार अविनाश वाळके, दैनिक लोकमतचे सुरेश कोमावार, दैनिक सकाळचे विजय वासेकर, दैनिक पुण्यनगरी चे दुर्वास घोंगडे, दैनिक लोकमतचे विकास शेडमाके, प्रदीप झाडे इत्यादी उपस्थित होते.

कार्यक्रम आटोपल्यानंतर एका गंभीर विषयावर पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेला वरील सर्व पत्रकार बंधू उपस्थित होते. पत्रकार परिषदेची बातमी स्वतंत्र आणि वेगळ्या स्वरूपाची असेल.

Post a Comment

0 Comments