Ticker

6/recent/ticker-posts

विधान परिषद आमदार सुधाकरराव अडवाले यांचा जनसेवा विद्यालय दिघोरी येथे भव्य सत्कार- शिक्षकांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन



विजय जाधव

जनसेवा माध्यमिक विद्यालय दिघोरीच्या वतीने विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार सुधाकर जी अडबाले यांचा भव्य जाहीर सत्कार करण्यात आला.



  ‌पोंभुर्णा तालुक्यातील दिघोरी येथे जनसेवा माध्यमिक विद्यालयात नवनिर्वाचित आमदार सुधाकर जी अडबले यांचा भव्य सत्कार कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटक चंद्रपूर वनी आर्णी लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार बाळूभाऊ धानोरकर हे होते. विशेष अतिथी म्हणून वरोरा भद्रावती निर्वाचन क्षेत्राच्या तडफदार आमदार प्रतिभाताई धानोरकर ह्या होत्या. स्वागत अध्यक्ष म्हणून चंद्रपूर जिल्ह्याचे काँग्रेसचे नेते जि प चे माजी उपाध्यक्ष विनोद भाऊ अहिरकर यांनी नवनिर्वाचित आमदाराचे शाल, श्रीफळ , पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
      यावेळी विविध शिक्षक संघटनांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. सत्काराचा कार्यक्रम जनसेवा माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक मनोज भाऊ आहेरकर यांनी आयोजित केला होता.
       सदर कार्यक्रमात जिल्ह्यातील विविध संघटनांनी नवनिर्वाचित शिक्षक आमदारांचा शिक्षक संघटनांनी सत्कार केला. यावेळी या सत्कार कार्यक्रमात बोलताना माननीय सुधाकरजी घडवाले यांनी, शिक्षक आणि शेतकऱ्यांसाठी मी सतत झटणार असून शासनाच्या विविध योजना मिळवून देण्याचे काम करणार असण्याची ग्वाही त्यांनी दिली.
        यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून माननीय खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी परिसरातील जनतेच्या विकासासाठी शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाच्या विरोधात जाऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी वेळप्रसंगी आंदोलन उभारू असे जाहीर वक्तव्य खासदार महोदयांनी केले .यावेळी बोलताना आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी अनेक प्रश्नांना वाचा फोडली. विरोधी पक्षात असताना काम करताना कशा पद्धतीच्या अडचणी येतात आणि ते कशा पद्धतीने सोडवले जातात ,आणि त्या मी तुमच्या क्षेत्रातील आमदार नसली तरी हा परिसर माझा समजून मी काम करत राहणार. शेतकरी कष्टकरी कामगार यासाठी न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मत व्यक्त केले.
       या कार्यक्रमाला जनसेवा माध्यमिक विद्यालयाचे संपूर्ण शिक्षक वृंद, विद्यार्थी, कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले. उत्कृष्ट संचालन आणि आभार प्रदर्शन विद्यालयाच्या वतीने करण्यात आले.

Post a Comment

0 Comments