,आरोग्य,आशासेविका, स्वच्छता कर्मचाऱ्यांचा गौरव
पोंभूर्णा प्रतिनिधि
दि.,९ मार्च
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत नगर पंचायत तर्फे विविध उपक्रम उत्साहात पार पडले. महिला दिनानिमित्त प्रामुख्याने महिलांचा गौरव; करण्यात आला.
महिला दिनानिमित्त स्त्री-शक्तीचा सन्मान करुन, निरोगी आरोग्याचा संदेश देत स्वच्छता अभियान राबविण्यार्या महिलांचा स्वच्छता कीट देऊन सन्मान करण्यात आला. सन्मान स्त्री कर्तृत्वाचा या कार्यक्रमांतर्गत अंगवाडी निवृत सेविकांचा शाल श्रीफळ व भेट वस्तू देत सत्कार करण्यात आला व अंगवाडी क्षेत्रात उत्कृष्ठ कामगीरी बजावण्यार्या सेविका महिलांचा गौरव करण्यात आला.
प्रारंभी सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस अभिवादन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष नगराध्यक्ष सुलभा गुरुदास पिपरे,प्रमुख उपस्थिती महिला बाल कल्याण सभापती रोहनी रुपेश ढोले,मुख्याधिकारी आशिष घोडे,पाणी पुरवठा,आरोग्य, स्वच्छता सभापती श्वेता वनकर,शिक्षण सभापती आकाशी गेडाम,नगरसेविका रिना उराडे, रामेश्वरी वासलवार, नंदा कोटरंगे, उषा गोरंतवार,गुरुनूले व आदी पदाधिकारी उपस्थीत होते.
नगरपंचायातच्या सभागृहात महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या आशावर्कर महिलांचा गौरव करण्यात आला.हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता न.पं.चे लेखापाल कपील भापकर,उत्कृन शर्मा,विभाग प्रमुख सुशांत आमटे,लिफिक रोशन येमूलवार,मडावी, वाघाडे,वंदना गांगरेडीवार,अभियंता महेश्वरी पिंपळशेंडे,व आदी कर्मचारी उपस्थीत होते.
महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेला कार्यक्रम उत्साहात पार पडले.
0 Comments