अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी
नागभीड :- नुकत्याच घोषित झालेल्या १२ वी च्या निकालात स्थानिक गोंडवन विकास संस्थेद्वारे संचालित सर्व-सामान्यांची शैक्षणिक संस्था अशी ओळख असलेल्या कर्मवीर कनिष्ठ महाविद्यालयाने आपली उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखली आहे.
कला शाखेतून कु.मोन्टी जागेश्वर हेमने 84-50% प्रथम
अविनाश संतोष ठाकरे 81-67% द्वितीय तर
गोरव संतोष मडावी 80-17% तृतीय आला आहे.
विज्ञान शाखेतून कु. विशाखा रवींद्र चिलबुले 73-50%प्रथम,
कु .आरती देवानंद प्रधान 73-17% व्दितीय
तर कु. जान्हवी लिलाधर कुंभलवार
आणि साहील भोजराज नवघडे हे 66-17% गुण घेत तृतीय आले आहेत.
महाविद्यालयाचा एकूण निकाल 91-61% असून कला शाखेचा 88-23% तर विज्ञान शाखेचा 96-92% आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य देविदास चिलबुले यांनी सर्व प्राध्यापक वृंदांसह प्रत्यक्ष भेटून गुणवंतांचे अभिनंदन केले.
गोंडवन विकास संस्थेचे सचिव --रवींद्र जुनवार अध्यक्ष --राजाभाऊ देशपांडे , संचालिका सौ.वर्षाताई रवींद्र जुनवार तथा सर्व संचालक मंडळाने गुणवंत विद्यार्थ्यांचे आणि प्राध्यापक वृंदांचे अभिनंदन केले आहे.
0 Comments