चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी/खासदार बाळू धानोरकर यांची प्रकृती बिघडली आहे. वडिलांच्या निधनानंतर त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना नागपूरमधून दिल्लीला एअर ॲम्बुलन्सने हलवले आहे.
चंद्रपूरमधील काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांची प्रकृती बिघडली आहे. वडिलांच्या निधनानंतर त्यांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना नागपुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या आतड्यात इन्फेक्शन झाल्याची माहिती रुग्णालय सुत्रांनी दिली आहे. त्यांना पुढील उपचारासाठी नागपूरहून दिल्लीला विशेष एअरॲम्बुलन्सने हलवले जाणार आहे. विशेष म्हणजे शनिवारी त्यांच्या वडिलांचे निधन झालं आहे. त्यांच्या वडिलांच्या पार्थिवावर आज (रविवारी) सकाळी चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे त्यांच्या मूळ गावी अत्यसंस्कार करण्यात आले आहे.
आता तर हद्दच झाली..! सावरकरांसाठी महाराष्ट्र सदनातील सावित्रीबाई-अहिल्यादेवीचे पुतळे हटवले, भाजप सरकारवर टीकेची झोड
आता तर हद्दच झाली..! सावरकरांसाठी महाराष्ट्र सदनातील सावित्रीबाई-अहिल्यादेवीचे पुतळे हटवले, भाजप सरकारवर टीकेची झोड
वडिलांच्या निधनानंतर काल संध्याकाळपासूनच बाळू धानोरकर यांना अस्वस्त वाटत होतं. त्यामुळे त्यांना नागपूरच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. मात्र प्रकृती बिघडल्यानं त्यांना आता विशेष एअरॲम्बुलन्सने दिल्लीला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांच्या आतड्यात इन्फेक्शन झाल्याचे सांगण्यात येत आहे.
काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांचे वडील नारायणरावजी धानोरकर यांचे नुकतेच नागपूर येथे निधन झाले आहे. ते दीर्घ आजाराने ग्रस्त होते. वयाच्या ८० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. आजच त्यांच्या वडिलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. चंद्रपूरमधील त्यांचे मूळ गाव भद्रावती येथे हा अंत्यविधी पार पडला.
0 Comments