👉मुलचेरा तालुक्यातील गोविंदपुर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मथुरानगर येथे माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांच्या हस्ते विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले👈
मथुरानगर येथील हरी मंदिर परिसरात सभा मंडप बांधकाम करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली होती.भाग्यश्री ताई आत्राम यांनी अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडे ही मागणी रेटून धरल्याने त्यांनी सदर सभा मंडप बांधकामासाठी निधी उपलब्ध करून दिले आहे.निधी प्राप्त होताच भाग्यश्री ताई आत्राम यांनी सदर कामाचे भूमिपूजन केले.
हरी मंदिर परिसरात सभा मंडप बांधकाम होणार असल्याने येथील नागरिकांनी समाधान व्यक्त करत ताईंचे आभार मानले.भूमिपूजन कार्यक्रमाला राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शाहीन हकीम,जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती युधिष्ठिर विश्वास,पुजारी अमर रॉय,रोहित मण्डल, स्वपन मंडल,विमल बैरागी,अनंत रॉय,भोलानाथ मंडल,सुबोध मंडल,रिक्की हलदार,कालीपद मल्लिक,बोजेन रॉय,विजय रॉय,आकाश मल्लिक,निताई रॉय,कालीपद विश्वास,पुतुल मिस्त्री,कविता रॉय,तृप्ती मंडल, मालती विश्वास, नमिता रॉय, सारधी मंडल, समुद्र रॉय आदी उपस्थित होते.
0 Comments