भद्रावती :
महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राचे विद्यमान खासदार तथा शिवसेनेचे पूर्वाश्रमीचे माजी आमदार बाळूभाऊ धानोरकर यांचे आज (दि. ३०) ला पहाटे २ च्या सुमारास निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या (दि. ३१) ला अंतिम संस्कार होणार आहेत.
या अंतिम संस्काराला खासदार बाळूभाऊ धानोरकरांचे राजकिय गुरु शिवसेना नेते खासदार मान. श्री. विनायकजी राऊत साहेब व माजी विधानपरिषद सदस्य मान. दुष्यंतजी चतुर्वेदी तथा पूर्व विदर्भ शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे अन्य पदाधिकारी वरोरा येथे सकाळी ११.०० वाजता
उपस्थित राहणार आहेत.
खासदार बाळूभाऊ धानोरकर हे शिवसेनेत होते त्यावेळेस पासून शिवसेना नेते मान. विनायकजी राऊत यांचेसह त्यांचे घनिष्ठ ऋणानुबंध होते. बाळूभाऊ धानोरकर यांची जळणघळण ही प्रामुख्याने शिवसेनेतूनच झाली. या घटनेचे त्यांना अतीव दुःख झाले आहे. अशा कठीण प्रसंगी पार्थिवाचे अंतिम दर्शन घेवून पक्षातर्फे श्रध्दांजली अर्पण करण्याकरीता व त्यांच्या परिवाराचे सांत्वन करण्यासाठी शिवसेना नेते मान. विनायकजी राऊत उपास्थित राहतील.
0 Comments