Ticker

6/recent/ticker-posts

काँग्रेस नेते व जिल्हा बँकेचे अध्यक्ष संतोषसिंहरावत यांचे वरील हल्लेखोर आणि सूत्रधारांवर कठोर कारवाई करावी- सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन




जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर: काँग्रेस नेते व चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत यांचे वर झालेल्या प्राणघातक हल्ला व गोळीबार प्रकरणी हल्ल्यातील आरोपी व त्यामागे असणारे सूत्रधार यांचेवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी पोंभुर्णा तालुक्यातील सर्वपक्षीय पुढार्‍यांच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.
      
     निवेदन देताना तालुक्यातील सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. मध्ये प्रामुख्याने काँग्रेस पक्षाचे माजी तालुका अध्यक्ष ओमेश्वर पद्मगिरीवार, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल संतोषवार, देवळा खुर्द चे सरपंच विलासराव मोगरकर, शिवसेना शहर प्रमुख व नगरसेवक गणेश वासलवार, माजी नगरसेवक अमरसिंह बघेल, नगरसेवक नंदकिशोर बुरांडे, पराग मूलकलवार, जाम तुकोमचे सरपंच भालचंद्र बोधलकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक वसंत पोटे, माजी ग्रामपंचायत सदस्य अशोक भाऊ गेडाम, सुनील कुंडोजवार, संजय ढोंगे, प्रकाश नैताम,विकास कोवे, राजू बोलमवार, राहुल देवतळे व सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते.
    या घटनेतील गुन्हेगारांना ताबडतोब पकडून त्यांचेवर कठोर कारवाई करण्यात यावी व यातील सूत्रधार कोण? ते जनतेसमोर पुढे यावे आणि त्यांचे वर कठोरातली कठोर कारवाई करण्यात यावी असेही या निवेदनात म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments