तालुका प्रतिनिधी
मुल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आणि पोंभुर्णा तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या जुनगाव येथे काही महिन्यापूर्वी सुरू असलेली अवैध दारू विक्री तंटामुक्त समिती व ग्रामपंचायतच्या काही पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन बंद करून घेतली. याचे स्वागतच करण्यात आले. तीन ते चार अवैध देशी दारू विक्रेते या गावात देशी दारू विकून रोजगार समजून व्यवसाय करत होते. काही महिन्यापूर्वी तंटामुक्त समिती च्या पदाधिकाऱ्यांनी दारू विक्रेत्यांच्याकडे घरी जाऊन त्यांना दारू विक्री करण्यास मज्जाव केला, आणि तंबी दिली.
तेव्हापासून काही दिवस गावात दारूबंदी चा अंमल पाहायला मिळाला. मात्र काही दिवसानंतर नवीनच दारू विक्रेत्यांनी एक नवीनच शक्कल लढवून पाच-पंचवीस टील्लू आणून आपापल्या दलालांच्या माध्यमातून तळीरामांना ही सेवा पुरवीत आहेत. त्यामुळे गावात ही कसली दारूबंदी असा प्रश्न सेवानिवृत्त पोलीस पाटील शिवरामजी पाल यांनी प्रस्तुत प्रतिनिधी जवळ व्यक्त केला आहे. दारूबंदी करायचीच आहे तर काटेकोरपणे करायला हवी अन्यथा त्या भानगडीत पडू नये असेही त्यांनी म्हटले आहे.
Taluka Representative
The illegal liquor sale which was going on a few months ago in Jungao, which is in the limits of Mul police station and at the end of Pombhurna taluka, was stopped by the Tantamukt Samiti and some office-bearers of the Gram Panchayat. It was welcomed. Three to four illegal country liquor sellers were doing business by selling country liquor in this village as employment. A few months ago the office bearers of Tantamukt Samiti went to the houses of liquor sellers and stopped them from selling liquor, and gave Tambi.
Since then, liquor ban was implemented in the village for a few days. However, after a few days, the liquor sellers have come up with a new form and are providing this service to Talirams through their brokers by bringing 5-25 tills. Therefore, retired police Patil Shivramji Pal has expressed the question to the present representative that what kind of liquor ban is this in the village. He has also said that if liquor ban is to be done, it should be done strictly otherwise we should not fall into that trap.
0 Comments