चंद्रपूर: पूरग्रस्त गावांना पावसाळ्यात पुरात अडकणाऱ्या गावांना तीन महिन्याचे राशन एकाच वेळेस देण्याचे आदेश राज्य सरकारने काढले आहेत. हे राशन मे अखेर पर्यंत वितरित करण्यात यावे असे आदेश देण्यात आले असले तरी मे च्या शेवट पर्यंत अद्याप पोंभुर्णा तालुक्यात कुठेही सदर अन्नधान्य वाटप झालेले नाही.
पुरात अडकणाऱ्या गावांना मिळणार तीन महिन्याचे एकदाच धान्य.
पावसाळ्यात राज्यातील अनेक गावांना पूर येतो अशा गावांचा संपर्क तुटतो आणि गावातील लोकांवर उपासमारीची वेळ येते अशा गावांना पावसाळ्यापूर्वी तीन महिन्याचे धान्य दिले जाणार आहे.
हे धान्य मे अखेरपर्यंत गावात पोहोचविण्याचे आदेश पुरवठा विभागाला देण्यात आलेले आहेत नवसंजीवनी योजनेच्या माध्यमातून हे धान्य लाभार्थ्यांना पुरवले जाणार आहे या योजनेत पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या गावांना समाविष्ट करण्यात येणार असून तहसीलदारांना असे गावे सुचविण्याचा आदेश आहेत त्यानुसार राज्यभरात नैसर्गिक आपत्ती विभाग आणि महसूल विभागाकडून अशी नावे पुरवठा विभागाकडे आले आहेत गावातील स्वस्त धान्य दुकानाकडून हे धान्य कार्डधारकांना नेता येणार आहे
या योजनेची अंमलबजावणी पूर्ण राज्यभरात केली जात आहे तर अशाप्रकारे पुरात अडकणाऱ्या गावांना एकाच वेळेस तीन महिन्याचे धान्य रेशन कार्ड धारकांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
0 Comments