Ticker

6/recent/ticker-posts

नांदगाव, जुनगाव,देवाडा बुद्रुक येथे वाघाची दहशत😸 बोंडाळा बुद्रुक येथील शेतकऱ्यांच्या गाईला केले गंभीर जखमी😺 वनविभाग कुंभकर्णी झोपेत, वाघाचे व्हिडिओ व्हायरल, तरीही वनकर्मी म्हणतात वाघच नाही😺



विजय जाधव: प्रतिनिधी
नांदगाव, जूनगाव, देवाडा बुजरूक, बोंडाळा बुद्रुक, बोंडाळा खुर्द या परिसरातील शेतशिवारात व गावालगत दररोज नागरिकांना वाघाचे दर्शन होऊनही वन विभाग मात्र तालुक्यात परिसरात वाघ नसल्याचे म्हणतो. त्यामुळे वन विभागाच्या भूमिकेवरच संशय निर्माण झाला आहे.
 शुक्रवारी बोंडाळा खुर्द येथील शेतकरी अशोक झोडे यांच्या गाईला गंभीर जखमी केले. तरीसुद्धा वन विभाग कुंभकर्णी झोपेत आहे. सोनगाव देवळा नांदगाव येथील वाघाचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे. असे असताना सुद्धा वनविभाग वाघच नसल्याची बतावणी करून वेळ मारून नेत असल्याने शेतकऱ्यांमध्ये वनविभागा प्रति संताप व्यक्त होत आहे.

नागरिकांना दररोज वाघाचे दर्शन होत असूनही वन विभाग गांभीर्य घेत नसल्याने तालुक्यातील नागरिक दहशतीत असून वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

नागरिक दहशतीच्या छायेत

परिसरात सातत्याने वाघाचा मुक्त संचार होत असल्याने शेतकरी वर्ग प्रचंड दहशतीखाली आलेला मात्र वनविभाग शेतकऱ्यांच्या समस्येकडे लक्षच देण्यास तयार नसल्याचे वास्तव समोर येत आहे.
      नांदगाव, जूनगाव, देवाडा, बोंडाळा बुद्रुक, बोंडाळा खुर्द इथल्या शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह हा शेतीवरच अवलंबून आहे. मात्र आता वाघ शेताकडे आणि गावाकडे धाव घेत आहे. त्यामुळे गावातील शेतकऱ्यांना शेतीची कामेदेखील करणे कठीण झाले आहे. तेव्हा वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली असली तरी वन विभाग कुंभकर्णी झोपेत आहे.
      विशेष म्हणजे वाघाच्या हल्ल्यात आतापर्यंत जिल्ह्यातील पन्नास जास्त नागरिकांचा नाहक बळी गेला आहे. आणखी किती बळी हवे आहेत असा प्रश्न वनविभागाला नागरिक करू लागले आहेत.

Post a Comment

0 Comments