चंद्रपुर : वणी घुग्गुस मार्गावरील शिव मंदिरापासून जवळच असलेल्या क्रिष्णा अपार्टमेंट मधील एका खोलीत चोवीस वर्षीय युवतीचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ माजली आहे.
आज 29 मे ला सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या युवतीचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. रूम मधून दुर्गंधी येऊ लागल्याने घर मालकाने याबाबत पोलीसांना माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळ गाठून खोलीची पाहणी केली असता ही खळबळजनक घटना उघडकीस आली. आरोही वैभव बारस्कर (२४) व आरोही वानखडे अशी दोन नावे असलेली आधारकार्ड मृतक युवती जवळ आढळून आल्याने तिचे माहेरचे नाव कोणते व सासरचे कोणते हा संभ्रम निर्माण झाला असून तिचे कुटुंबीय आल्यानंतरच तिच्या नावाची स्पष्टता होईल.
ही युवती वर्धा जिल्ह्यातील समुद्रपुर तालुक्यातील निंबी या गावची रहिवासी असल्याचे प्रथम दर्शनी समोर आले आहे. युवतीचा मृतदेह संशयास्पद रित्या आढळून आल्याने घातपाताची शक्यता वर्तविली जात आहे.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला आहे. दरम्यान या घटनेमुळे चंद्रपूर शहरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनेच्या मुळाशी गेल्यास युवतीच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.
0 Comments