👉 डॉक्टर व रुग्णातील जिवाभावाच जगाला प्रत्यय.
👉 स्वत:सह कुटुंबाला विसरून रुग्णांसाठी जिवांची बाजी.
मुंबई : प्रतिनिधी / दिनांक:- १७ जुन २०२३ :- भारतासह संपूर्ण जगच कोरोना महामारीच्या भीषण संकटात सापडले होते. कोरोना विषाणूच्या लढाईत डॉक्टर सर्वांत पुढे आलेत. रुग्णांना कोरोना महामारीतून वाचविण्यासाठी स्वत:च्या जिवाची पर्वा न करता अहोरात्र संघर्ष केले.
अनेक डॉक्टरांचे बलिदान झाले. परंतु महाराष्ट्र शासन अजूनही त्यांच्या महान आहुतीयुक्त कार्याची कदर करित नाही. ही शासनाच्या बाबतीत शरमेची बाब आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. रुग्णालयात प्रत्यक्ष उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे योगदान आजही तेवढेच महत्त्वाचे आहे. या संकट काळात रुग्ण व डॉक्टरांतील नाते अधिकच दृढ झाले आहे, औषधोपचार तज्ञ डॉक्टरांनी रुग्णालयात रुग्णांची सेवा करीत असतांना आपल्या प्राणांची आहुती दिली. आजही काही अपवाद वगळता डॉक्टरांनी रुग्णसेवेची परंपरा कायम ठेवली आहे. डॉक्टर व्यावसायिक झाले आहेत, असा आरोपही होत असतो. प्रत्येक गोष्टीला अपवाद असतातच. पैशांच्या मागे धावणारी डॉक्टर मंडळी अपवादात्मकच म्हणता येतील. पैसा सर्वांनाच कमवावा लागतो. प्रत्येकालाच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवावा लागतो. असे असले तरी प्रपंच नेटका करून परमार्थही साधावा, ही संतांची शिकवण नेहमीच प्रेरणा देत राहते.
आजही जिवाची पर्वा न करता रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी अनेक डॉक्टर धडपडतांना दिसून येतात. कोविडच्या निमित्ताने डॉक्टर व रुग्ण यांच्यातील जिवाभावाच्या संबंधांचा जगाला प्रत्यय आला आहे. शासकीय रुग्णालयातील डॉक्टर व आरोग्यसेवक , परिचारिका यांनी स्वत:सह कुटुंबाला विसरून कोरोना बाधितांना वाचविण्यासाठी आजही प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. अंगावर पीपीई कीट चढविली की, अंगाला दरदरून घाम फुटत होता . पाणी पिता येत नव्हते.. काही परिचारिका व डॉक्टर , रुग्णांचा जिव एवढेच त्यांचे विश्व बनले होते. दिवसभर विषाणूच्या विळख्यात असल्याने बाहेर पडल्यावर आपल्यामुळे कुटुंबीय किंवा मित्रांना संसर्ग होणार तर नाही ना!! अशी भावना मनात घर करून बसली होती. स्वत:ची लहान मुले, पत्नी, वृद्ध आईवडील यांच्यापासून अलिप्तता ठेवणे अपरिहार्य होते. डॉक्टर मंडळींनी खासगी आयुष्यापेक्षा कोरोना लढाईला महत्त्व दिले. कित्येकांनी आपले लग्न पुढे ढकलले आहे. कोरोनामुळे उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे कुटुंबच बाधित झाले. परिचयातील मित्रांना जीव गमवावा लागला. रुग्णसेवेसाठी डॉक्टरांनी केलेला हा अत्यंत महत्त्वाचा त्यागच आहे. त्याची दखल समाजाने घेतली . मात्र आजच्या स्थितीत महाराष्ट्र राज्य सरकारने घेतलेली दिसुन येत नाही. ही फार मोठी शोकांतिकाच म्हणावी लागेल. डॉक्टरांना कोरोना योद्धे म्हणून वेगळी ओळख दिली असली तरी महाराष्ट्र राज्य सरकारने त्यांच्या खऱ्या बलिदानाच्या कार्याची कदर केली नाही. हे सद्यस्थितीत शासन दरबारी रेंगाळत ठेवलेल्या पोकळ आश्वासनात्मक प्रकरणावरून दिसुन येते. रुग्णांच्या आरोग्याचा विचार सर्वतोपरी कोरोना व्यतिरिक्त इतर अनेक गंभीर आजार आहेत. रस्ते अपघात आहेत. त्यातून रुग्णांना बरे करण्यासाठी डॉक्टर प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहेत.
गरीब रुग्णांना मुंबई, ठाणेला जाऊन उपचार घेणे परवडत नाही. त्यामुळे रुग्णांना प्राणही गमवावे लागतात.
हे लक्षात घेऊनच विविध सुविधांनी युक्त शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी यथायोग्य अहोरात्र जिवाची पर्वा न करता सेवा दिली. डॉक्टर या नात्याने रुग्णांच्या आरोग्याचा विचार नेहमीच सर्वतोपरी राहिला आहे. शासनाने नव्याने सुरू केलेल्या " आपला दवाखाना " उपक्रमांतर्गत तसेच आरोग्य उपकेंद्रात निवड केलेल्या सिएचओ यांची शैक्षणिक पात्रता बी. एस्सी. नसिंऀग असुन असे कर्मचारी आॅपरेशन तसेच करून रुग्णांचे प्राण वाचविले शकत नाही. तसेच शवविच्छेदनही करु शकत नाही. महाराष्ट्र राज्यातील अनेक रुग्णालयात तज्ञ डॉक्टरांची हजारो पदे रिक्त असुन 30 नोव्हेंबर 2022 रोजीच्या प्राप्त अहवालानुसार लक्षात येते. तरीही शासन आता " काम झालं माझं.... तुझं " असे शासनाचे धोरण सुरू झाले आहे.
0 Comments