अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी
नागभिड----बेरोजगारीने त्रस्त असलेल्या अभ्यासु विद्यार्थ्यांना कोतवाल भरती पारदर्शक होईल असे वाटले होते त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते त्यामुळे काल दिनांक 15/06/2023 रोजी कोतवाल भरती करिता नागभीड येथील गोविंद राव वारजूकर महाविद्यालय मध्ये पेपर घेण्यात आले होते, त्यावेळी पेपरमध्ये पारदर्शकता राहावी करिता सेंटरमध्ये कुठलेही मोबाईल,घड्याळ, व इत्यादी साधन घेऊन जाण्यास बंदी होती, परंतु परीक्षा रूम मध्ये विद्यार्थी बसले असता, विद्यार्थ्यांना देण्यात आलेले उत्तर पत्रिकेसह प्रश्नपत्रिका संच सिलबंद पॉकेटमध्ये नव्हती, त्यामुळे कुठल्याही विद्यार्थ्यांच्या साहिनीशी पेपर संचाचा सील उघडण्यात आलेला नाही, आजपावेतो झालेल्या कुठल्याही पदभरती मध्ये पेपरसंच हा सील बंद असतो, परंतु इथे पेपरसंच सिलबंद नसल्यामुळे पारदर्शकता राहलेली नसून कोतवाल भरती परीक्षा रद्द करीत पुनश्च कोतवाल भरतीचे पारदर्शक रित्या पेपर घेण्यात यावे, करीता परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेे.
यावेळी अश्विन मेश्राम, धीरज अलोने, फिरोज बन्सोड, देवेंद्र गेडाम, सुजित अलोने, संगम गेडाम, रेवनाथ बोरकुटे, विलास बोरकुटे, आनंद भुजाडे, भूषण धोटेकर, रजत गजभिये, समीर गेडाम हे परीक्षार्थी उपस्थित होते.
0 Comments