Ticker

6/recent/ticker-posts

*मराठी अभिनय विश्वाचे "अभिनय सम्राट"अशोक सराफ यांचा आज वाढदिवस* *चला जाणून घेऊया त्यांचा जीवन प्रवास* *बँकेची नोकरी ते अभिनय क्षेत्र; असा सुरू झालेला अशोक सराफ यांचा फिल्मी प्रवास!*

*मराठी अभिनय विश्वाचे "अभिनय सम्राट"अशोक सराफ यांचा आज वाढदिवस*


*चला जाणून घेऊया त्यांचा जीवन प्रवास*


*बँकेची नोकरी ते अभिनय क्षेत्र; असा सुरू झालेला अशोक सराफ यांचा फिल्मी प्रवास!*


छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत अशोक सराफ यांनी आपल्या दमदार अभिनयाने आपले सर्वांचे मनोरंजन केले आहे.


 मराठी मनोरंज विश्वाचे ‘अभिनय सम्राट’ आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे अभिनेते अशोक सराफ यांचा आज (४ जून) वाढदिवस आहे. छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत अशोक सराफ यांनी आपल्या दमदार अभिनयाने आपले सर्वांचे मनोरंजन केले आहे.


 दरम्यान, आज आम्ही तुम्हाला अशोक सराफ यांच्या आयुष्यातील काही न ऐकलेल्या पैलूंबद्दल सांगणार आहोत. बँकेत नोकरी करणारे अशोक मामा अभिनयाच्या वेडामुळे मनोरंजन विश्वाकडे वळले होते.


सध्याच्या काळात नोकरी सोडून व्यवसायाकडे वाटचाल केल्याचे किस्से सर्रास पाहायला मिळतात. मात्र, ८०-९०च्या दशकात, सरकारी नोकरी वगळता प्रत्येकजण आपली स्वप्ने पूर्ण करण्याचा धोका पत्करत नव्हता. मात्र, अभिनेते अशोक सराफ यांनी हा पराक्रम केला. अभिनय कारकिर्दीपूर्वी अशोक सराफ ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’मध्ये काम करायचे. सुशिक्षित कुटुंबातील असल्यामुळे त्यांच्या वडिलांना त्यांना सरकारी नोकरी करताना पाहायचे होते. अशोक सराफ यांनी वडिलांचा आदेश पाळला आणि नोकरी देखील मिळवली. मात्र, अभिनयाचं वेड त्यांना बालपणापासूनच होतं. त्यामुळे नोकरीसोबतच अशोक सराफ रंगभूमीशी देखील जोडले गेले. यादरम्यान, आपल्या अभिनय कौशल्यात सुधारणा करण्याबरोबरच, अशोक सराफ यांनी नाटकांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली.


मराठी चित्रपटसृष्टीसोबतच अशोक सराफ यांनी बॉलिवूड चित्रपटसृष्टीलाही भरपूर वेळ दिला आहे. यादरम्यान अशोक सराफ यांनी अनेक मराठी टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. अशोक सराफ यांचे नाव मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहे. त्यामुळेच अशोक सराफ यांना मराठी चित्रपटसृष्टीचे ‘अभिनय सम्राट’ म्हटले जाते. मराठी चित्रपटसृष्टीत बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या अशोक सराफ यांनी तब्बल २५० हून अधिक चित्रपट केले आहेत.


अशोक सराफ यांनी आपल्या विनोदी कौशल्याच्या जोरावर छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत लोकांना खूप हसवले आहे. अशोक सराफ यांच्या ‘अशी ही बनवाबनवी’मधील ‘धनंजय माने’ आणि सलमान खान-शाहरुख खानचा चित्रपट ‘करण अर्जुन’मधील ‘मुन्शी’ या व्यक्तिरेखेने सर्वांची मने जिंकली.


साभार

Post a Comment

0 Comments