१८ वर्षांखालील मुलांनी दुचाकी चालविल्यास पालकांना २५ हजारांचा दंड;
Daraaraa24
मुंबई : कमी वय असलेल्या व लायसन्स नसलेल्या व अल्पवयीन मुलांना दुचाकी चालविण्यापासून प्रतिबंध करणे व पालकांचे समुपदेशन करण्याच्या सुचना नविन मोटार वाहन कायद्यात तरतुद करण्यात आली आहे. त्यामूळे १८ वर्षाखालील मुल दुचाकी चालवतांना आढळून आल्यास पालकांना २५ हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.
१८ वर्षाखालील कोणत्याही मुलांनी कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी मोटार वाहन चालवु नये. परंतु ५० सीसी पेक्षा जास्त नसलेली इंजिन क्षमता असलेली मोटार सायकल वयाच्या सोळाव्या वर्षानंतर सार्वजनिक ठिकाणी चालविता येणार आहे.
अशा परिस्थितीत लायसन्स नसलेल्या अल्पवयीन मुलांना दुचाकी चालविण्यापासून प्रतिबंध करावे. तसेच त्यांच्या पालकांचे समुपदेशन करावे तरीही नियमाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर मोटार वाहन कायदा १९८८ कलम १८०, १८१ १९९ (अ) अंतर्गत दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी दिले आहे. त्याशिवाय दुचाकीवर एका पेक्षा अधिक आणि हेल्मेट सक्ती सुद्धा प्रभावीपणे राबवण्याचे आदेश दिले आहे.
0 Comments