Ticker

6/recent/ticker-posts

दिवंगत खासदार बाळू भाऊ धानोरकर यांना पोंभुर्णा येथे भावपूर्ण श्रद्धांजली



पोंभूर्णा दि.७ जून - चंद्रपूर-वणी -आर्णी लोकसभा क्षेत्राचे महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचे एकमेव लोकप्रिय खासदार स्व.बाळूभाऊ धानोरकर यांचे नुकतेच 30 मे रोजी वयाच्या 47 व्या वर्षी दुःखद निधन झाले. बाळूभाऊ धानोरकर याच्या निधनामुळे पोंभुर्णा तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे. या दुःखातून सावरण्यासाठी आणि बाळूभाऊ यांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी पोंभुर्णा तालुका काँग्रेस,व शिवसेना पक्षाच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


यावेळी स्व.बाळूभाऊ धानोरकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व पुष्पांजली अर्पण करुन सर्व उपस्थितांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. याप्रसंगी शोक संवेदना माजी आमदार देवराव भांडेकर, माजी जि.पं.उपाध्यक्ष विनोद अहिरकर, कृ.उ.बा. समितीचे सभापती रवी मरपल्लीवार शिवसेना तालुका प्रमुख न.पं.गटनेता आशिष कावटवार इत्यादींनी स्व.खासदार धानोरकर यांच्यावर आपल्या भावना व्यक्त केल्या.

खा.स्व.बाळूभाऊ धानोरकर यांनी तालुक्यामधील अनेक समस्या स्वतः पुढाकार घेऊन मार्गी लावल्या, तसेच भविष्यात सुद्धा तालुक्याच्या विकासासाठी निश्चित च ते सहकार्य करणार होते. पण आज ते आपल्यात नाही हे दुःख असह्य होत आहे. या शब्दात अहिरकर त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी उपस्थितांमध्ये अत्यंत भावूक वातावरण निर्माण झाले, शेवटी स्व. बाळूभाऊ धानोरकर यांच्या आत्म्यास शांती मिळण्यासाठी सर्वांनी उभे राहून दोन मिनिटं मौन पाळून श्रद्धांजली अर्पण केले.


यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितिचे संचालक वसंत पोटे, वासूदेव पाल,विनोद थेरे, माजी नगरसेवक जयपाल गेडाम,पराग मुलकलवार,राकेश नैताम,रवींद्र ठेंगणे, प्रशांत झाडे,आनंदराव पातळे,मडावार,वसंत मोरे,आशिष अहिरकर, पढरी मत्ते,अमित पाल,संचालक अशोक साखलवार, प्रफुल लांडे, भारती बदण,विनायक बुरांडे,महेश श्रीगिरीवार,यांच्या सह काँग्रेस, शिवसेना व सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी,उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments