Ticker

6/recent/ticker-posts

दोन बायका फजिती ऐका, भर रस्त्यात नवऱ्याला बायकांनी चपलेलने हाणलं!



नालंदा, 4 जून : बिहार शरीफ सदर रुग्णालयात शनिवारी कौटुंबिक वादाचे रुपांतर मारहाणीत झाल्याचे पाहायला मिळाले. एकाच तरुणाला आपला पती म्हणवून दोन महिलांचे आपापसात जोरदार भांडण केले. दोघांमध्ये बाचाबाची झाली. तसेच चप्पलने मारहाणही करण्यात आली. दोन महिलांमध्ये झालेल्या या भांडणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

नेमकं काय घडलं -

हे प्रकरण बिहार शरीफ येथील सदर हॉस्पिटलशी संबंधित आहे. प्रेमजीत नावाच्या तरुणाने गुपचूप दुसरे लग्न केले. तो व्यवसायाने मजूर आहे. त्याची दुसरी पत्नी अनिशा कुमारी गरोदर आहे, तिच्या तपासणीसाठी प्रेमजीत तिला सदर रुग्णालयात घेऊन गेला. दरम्यान, प्रेमजीतची पहिली पत्नी ज्युली हिला याबाबत माहिती मिळाली होती. मग तिने सासूसह सदर हॉस्पिटल गाठले आणि अनिशाला प्रेमजीतसोबत पाहून तिचा पाराच चढला आणि तिने ती प्रेमजीतच्या दुसऱ्या पत्नीवर तुटून पडली.

हा सर्व प्रकार पाहून या रुग्णालयात गोंधळाचे वातावरण तयार झाले होते. तसेच लोकांची गर्दीही जमली होती. लोकांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता दोघांनाही ते पटले नाही. ते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसले. एवढेच नाही तर हा वाद इतका वाढला की, हा वाद लाथा-चप्पलने मारहणा करत थेट हॉस्पिटलच्या आवारातून सदर हॉस्पिटल चौकापर्यंत गेली.

प्रेमजीत हा मजूरी करतो. तो बिहार शरीफच्या लाहेरी पोलीस स्टेशन हद्दीतील रामचंद्रपूर फिश मार्केटचा रहिवासी आहे. त्याची दुसरी पत्नी अनिशा कुमारी मुख्य नवादा जिल्ह्यातील रहिवासी आहे. तीन महिन्यांपूर्वी प्रेमजीतने तिच्याशी लग्न केले आहे. या दरम्यान, ती गरोदर असल्याने सदर रुग्णालयात उपचारासाठी प्रेमजीत तिला घेऊन आला होता.

पहिली पत्नी ज्युली कुमारीला याची माहिती मिळताच, ती हॉस्पिटलमध्ये पोहोचली आणि पतीशी वाद घालू लागली. पहिली पत्नी जुली कुमारीने आरोप केला आहे की, तिचे प्रेमजीतसोबत 10 वर्षांपूर्वी लग्न झाले होते आणि त्यांना दोन मुले आहेत. परराज्यात राहून मजुरीचे काम करत असल्याचे सांगून तो घरातून निघाला होता. मात्र, त्याने दुसरे लग्न करुन तो दुसऱ्या ठिकाणी राहायला लागला होता.

त्याचवेळी प्रेमजीतने पहिल्या पत्नीवर आरोप केला की, ती त्याला त्रास देत असे. त्यामुळेच त्यांनी नवादा कोर्टात दुसरे लग्न केले. प्रेमजीत म्हणतो की, मला दोघांना एकत्र ठेवायचे आहे. पण पहिली बायको आमच्या आईकडे राहील, तिचा खर्च मी दर महिन्याला देईन आणि मी दुसऱ्या पत्नीसोबत राहीन. दरम्यान, प्रेमजीतची पहिली पत्नी ज्युलीने महिला पोलीस ठाणे गाठले आहे. तर दुसरीकडे तिचा पती दुसऱ्या पत्नीसह फरार झाला आहे.

साभार

Post a Comment

0 Comments