*नागभीड जिल्हा निर्मिती कृती समितीच्या वतीने निषेध*
• काळ्या फिती व मंजुरी पत्राची होळी करून नोंदविला निषेध.
• जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी यांना दिले निवेदन
अरुण रामुजी भोले
नागभीड तालुका प्रतिनिधी
नागभीड---- राज्य शासनाने 13 जुन रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापण करण्यासाठी मंजुरी दिली.. आणी यात सिंदेवाही, ब्रम्हपुरी,नागभीड या तालुक्यांचा येथील लोकांची मते लक्षात न घेता समावेश करण्यात आल्याने नागभीड सह ब्रम्हपूरी व सिंदेवाही या तालुक्यातील लोकांमध्ये शासनाच्या या निर्णयाबद्दल प्रचंड चिड निर्माण झाली आहे.
या आधी 2019 मध्ये अश्याच प्रकारचा निर्णय घेण्यात आला होता तेव्हा मा.जिल्हाधिकारी यांनी लोकांच्या हरकती मागविल्या होत्या व मा. जिल्हाधिकारी यांना चिमूर हे सोयीचे ठिकाण नसल्याने त्यात समावेश करू नये असे निवेदन देण्यात आले होते. मात्र यावेळी सरकारने लोकशाही चे मूल्ये पायदळी तुडवत लोकांची मते लक्षात न घेता थेट निर्णय घेतलेल्या नागभीड जिल्हा निर्मिती कृती समितीच्या वतीने काळया फिती बांधून या निर्णयाचा निषेध करीत या मंजुरी आदेशाची राम मंदिर चौकात होळी करण्यात आली.. व चिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय कक्षेत नागभीड तालुक्याचा समावेश करू नये यासाठी तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी तसेच उपविभागीय अधिकारी ब्रम्हपुरी यांना निवेदन दिले.
नागभीड जिल्हा निर्मिती कृती समितीच्या वतीने दिलेल्या निवेदनाची योग्य दखल घेऊन चिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय नागभीड नागभीड तालुक्याचा समावेश करू आणी अशी मागणी करण्यात आली आणी दखल न घेतल्यास समोर आक्रमक पद्धतीने लढा देण्याचा इशारा देण्यात आलेला आहे.
0 Comments