पत्नीच्या चारित्र्याचा संशयाचा भूत मानगुटीवर बसला...आणि पत्नीचा डाव फसला,
पतीने कुराडीने वार करून केले पत्नीला ठार! पोंभुर्णा तालुक्यातील थरारक घटना
तालुका प्रतिनिधी
संशयाचा भूत मानगुटीवर बसला की अखे संसार उध्वस्त होते, या शंकेच्या भूताने अनेकांना उध्वस्त करून सोडले आहे. अशाच संशयाने पछाडलेल्या एका व्यक्तीने स्वतःच्या पत्नीला कुराडीने वार करून जाग्यावर ठार केले. यात दोन मुली ही गंभीर जखमी झाल्या आहेत. घटनेमुळे तालुक्यात नव्हे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
पोंभुर्णा तालुक्यातील डोंगर हळदी माल येथे मंगळवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. आशा मनोज लेनगुरे वय 38 वर्षे असे मृत महिलेचे नाव आहे. तर पूनम मनोज लेनगुडे वय बारा वर्ष, अंजली मनोज लेनगुरे वय सतरा वर्ष या दोन मुली गंभीर जखमी झाल्या असून त्यांना उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
आरोपी मनोज लेनगुरे वय 40 याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे. या घटनेमुळे संपूर्ण तालुका हादरून गेला आहे.
0 Comments