पोंभूर्णा दि.५जून : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती द्वारे शासनाच्या आधारभूत खरेदी योजनें अंतर्गत मका खरेदी केंद्राचे आज उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवी मरपल्लीवार व उपसभापती आशिष कावटवार यांचे हस्ते करण्यात आले.
मका आवक कमी झालेली असतांना सुद्धा बाजारभावात कमालीची घसरण झालेली आहे. पोल्ट्री उद्योगावर मोठा परिणाम झाल्याने उत्पादक शेतकरी मका खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत वारंवार मागणी करीत होते.
पिकांची विविधता,आवक बघता येथील अन्न पुरवठा विभागाच्या गोदाम मध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती तर्फे मकाची खरेदी करण्यात येत आहे.
आज मका खरेदी केंद्राचा शुभारंभ कारीत विक्री करण्यात आलेल्या शेतकऱ्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी संचालक वसंत पोटे,रवी गेडाम,वासूदेव पाल,विनायक बुरांडे,अशोक साखलवार,सुनील कटकमवार,प्रवीण पिदूरकर, नैलेश चिंचोलकर, विनोद थेरे, भारती बदन, सुंनदा गोहने, सचिव शाम पदमगिरीवार, अन्न पुरवठा विभागाचे लिपिक गेडाम, केंद्राचे प्रमुख लिलाधर बुरांडे,आदी कर्मचारी,हमाल, मापारी आदी उपस्थित होते.
0 Comments