Ticker

6/recent/ticker-posts

"*मानवतेचे प्रचारक*" पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन.



आंतरराष्ट्रीय धम्म जागृती युवा संघातर्फे आयोजित मानवतेचे प्रचारक या काव्य पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

जानेवारी 2022 ते एप्रिल 2023 या वर्षात प्रकाशित कविता संग्रह
हा पुरस्कार देण्यात येणार आहे.


या पुरस्कारासाठी सन्मानचिन्ह शाल व भारतीय संविधान प्रत देउन कवींचा सन्मान करण्यात येईल.


या काव्य पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविताना कवितासंग्रहाच्या 3 प्रती व फोटोसहित अल्पसा परिचय खाली दिलेल्या पत्त्यावर दिनांक १५ जुलै २०२३ पर्यन्त पाठवावेत.

परीक्षकांचा व निवड समितीचा निर्णय अंतिम राहील. ऑक्टोंबर महिन्यात आयोजित कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान करण्यात येईल.

पुरस्कारासाठी आलेले साहित्य सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालय कन्नमवार नगर आर्वी येथे ग्रंथभेट म्हणुन देण्यात येईल.


सोबतच पत्रकारिता, सामाजिक क्षेत्र व धम्मप्रचार व प्रसार व अंधश्रद्धा निर्मुलन क्षेत्रातील मान्यवरांचा सुध्दा मानवतेचे प्रचारक हा पुरस्कार देउन सन्मान करण्यात येणार आहे. पुरस्कार जाहीर झालेल्या व्यक्तींना उपस्थित राहणे गरजेचे आहे.

मानवतेचे प्रचारक
*सुरेश किसनराव भिवगडे* ( बोधी )
*डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर बुद्ध विहार जवळ*
*आर्वी तालुका आर्वी जिल्हा वर्धा*
४४२२०१
८३०८९१३११५

Post a Comment

0 Comments