नांदगावच्या महिला सरपंचावर अपात्रतेची टांगती तलवार-
वृक्षतोड प्रकरण आले अंगलट, विकास कामेही थंड बस्त्यात -उपसरपंच देउरकर यांचा आरोप
चंद्रपूर: मुल तालुक्यातील राजकीय दृष्ट्या अतिसंवेनशील असलेल्या नांदगाव ग्रामपंचायतच्या सरपंच एडवोकेट हिमानी वाकुडकर यांना अप्पर आयुक्त नागपूर यांनी सुनावणी नोटीस बजावली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
सरपंच िमानी वाकुडकर यांचे वर जिल्हा परिषद शाळेतील 20 वृक्ष तोडल्याचा आरोप आहे. कुठलीही परवानगी न घेता शाळा प्रशासनाला सुद्धा विश्वासात न घेता वृक्ष तोडून त्यांनी वृक्ष लागवडीचा जणू फजा उडवला आहे असा आरोप खुद्द उपसरपंच सागर देवकर यांनी केला आहे.
एकीकडे वृक्ष लागवड करून पर्यावरण वाचवण्याचे आवाहन करण्यात येत असताना त्यांनी वृक्ष लागवडी ऐवजी वृक्ष तोड केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवून अप्पर आयुक्त नागपूर यांचेकडे तक्रार दाखल केली असल्याने त्यांना 17 जुलै 2023 रोजी उपस्थित राहण्याची सुनावणी नोटीस बजावले आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे नागरिकांच्या नजरा खिळल्या आहेत. मात्र सरपंच स्वतः वकिलीच्या विद्यार्थिनी असल्यामुळे यातून त्या सुखरूप बाहेर निघतील असा आशावाद त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केला आहे. त्या आल्यापासून गावातील बरीच विकास कामे झाली असल्याचा दावा त्यांच्या समर्थकांनी केला असून विरोधक त्यांनी केलेला विकास बघू शकत नाही. म्हणून ते उठ सुट सरपंच महोदयांच्या मागे लागले असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे.
0 Comments