अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी
नागभिड---चंद्रपूर जिल्ह्यातील अन्न नागरी पुरवठा विभागाद्वारे नागभिड तालुक्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत वितरण करण्यात येणाऱ्या जिवनाश्यक वस्तूंवर देखरेख करण्याकरिता माजी पंचायत समिती सदस्य आणि भाजपा तालुकाध्यक्ष संतोष विठ्ठलराव रडके यांची नागभीड तालुका पातळीवरील दक्षता समितीवर अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. या समितीमध्ये अन्य सदस्य म्हणून तालुक्यातील महिला, सौ,वसुधा नामदेव गुरपुडे , सौ,नीता अरविद बोरकर, सौ,गायत्री संजय हेमने, सौ,धनश्री धनराज काटेखाये, सौ, माधुरी विलास दोनोडे, बाळूजी अभिमन डबले, केदारनाथ काशिनाथ मेश्राम, मारोती रामदास उईके, धनराज राजाराम बावनकर, हेमराज दौलत ठाकरे यांची सदस्य पदी निवड झालेली आहे.
या निवडीबद्दल मिञ मंडळीनी अभिनंदन केले आहे,
0 Comments