*संघटन कशासाठी?संघटनेची गरज काय?आपण संघटित का व्हायचे?*
मोहनभाऊ देवतळे..
विविध उद्देश साध्य करण्सासाठी विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन ध्येय प्राप्तिसाठी एकत्रित आलेला जनसमुदाय म्हणजे संघटन होय.
*1.मी,माझे,मला ह्या संकुचित विचारातून बाहेर पडण्यासाठी व मीही समाजाचं देणं लागतो ही समाज ऋणाची भावना विकसित करण्यासाठी संघटनेची गरज आहे.*
*2.या देशातील शोषणाची व्यवस्था बदलण्यासाठी संघटनेची गरज आहे.*
*3.अन्यायाचा प्रतिकार व सामाजीक,आर्थिक न्याय प्रस्थापीत करण्यासाठी संघटनेची गरज आहे.*
*4.दुःखी,कष्टी,वंचित, उपेक्षित ह्यांचा उद्धार करण्यासाठी संघटनेची गरज आहे.*
*5.संविधान व आरक्षणाचे संरक्षण करण्यासाठी संघटनेची गरज आहे.*
*6.आपले सामाजिक,आर्थिक,शैक्षणिक अधिकारांचे रक्षण करण्यासाठी संघटनेची गरज आहे.*
*7.आपला एकटेपणा घालविण्यासाठी संघटनेची गरज आहे.*
*8.सामाजिक ऐक्य व बंधुत्वाची भावना रुजविण्यासाठी संघटनेची गरज आहे.*
*9.लाचारी,गुलामगिरी, हुजरेगिरी झिडकारण्यासाठी संघटनेची गरज आहे.*.*
*10.स्वाभिमानाने जीवन जगण्यासाठी संघटनेची गरज आहे.*
*11.भयमुक्त,भूखमुक्त, भ्रष्टाचारमुक्त व समतायुक्त समाज घडविण्यासाठी संघटनेची गरज आहे.*
*12.मैत्रिभाव निर्माण करण्यासाठी संघटनेची गरज आहे.*
*13.गरजूना मदत,भुकेल्याना अन्न,रुग्णांना उपचार व औषधींची व्यवस्था करण्यासाठी संघटनेची गरज आहे.*
*14.समतावादी,विवेकवादी, विज्ञानवादी,मानवतावादी समाजाच्या निर्मितीतीसाठी संघटनेची गरज आहे.*
*15.मनाची मशागत व हृदयाची विशालता विकसित करण्यासाठी संघटनेची गरज आहे.*
*16.गांभीर्यपूर्वक विचारविनिमय व त्यातून निर्णय क्षमता विकसित करण्यासाठी संघटनेची गरज आहे.*
*17.सत्यशोधक वृत्ती विकसित करण्यासाठी संघटनेची गरज आहे.*
*18.याच जन्मी मानवाचे कल्याण व्हावे त्यास्तव संघर्षरत राहण्यासाठी संघटनेची गरज आहे.*
*19.समाजातील अज्ञान,अंधश्रद्धा,अशिक्षितपणा,दारिद्र्य,विवंचना,गुलामी दूर करण्यासाठी संघटनेची गरज आहे.*
*20.सामाजिक शक्ती व ऐक्यातून दुर्बलांचे संरक्षण करण्यासाठी संघटनेची गरज आहे.*
*21.लोकशाही,समाजवाद, धर्मनिरपेक्षता ह्या संविधानिक मूल्यांची जपणूक व रुजवणूक करण्यासाठी संघटनेची गरज आहे.*
*22.शिक्षणवंचित,सत्तावंचित,संपतीवंचित,सन्मानवंचित सामान्य जणांना शिक्षण देऊन सक्षम बनविण्यासाठी संघटनेची गरज आहे.*
*23.संविधान निर्मात्यास अभिप्रेत व अपेक्षित समाज घडविण्यासाठी संघटनेची गरज आहे.*
*24.निर्भय,प्रामाणिक,राष्ट्रनिष्ठ, चारित्र्यसंपन्न व्यक्ती व समाज घडविण्यासाठी संघटनेची गरज आहे.*
*25.शिवराय व भीमराय ह्यांना अभिप्रेत राष्ट्रीय चारित्र्य निर्माण करण्यासाठी संघटनेची गरज आहे.*
*26.व्यक्ती व समाजाचे मत,मस्तीस्क,हृदय परिवर्तन करण्यासाठी संघटनेची गरज आहे.*
*27.जातिभेदविरहित, धर्मभेदविरहित समाजाच्या निर्मितीसाठी संघटनेची गरज आहे.*
*28.संविधानाची प्रभावी व कठोर अमलबजावणी करण्यासाठी संघटनेची गरज आहे.*
*29.भगवान बुद्धांची प्रज्ञा शील करुणा,भगवान महावीरांची अहिंसा व अपरिग्रह,गुरुनानकांची समाजनिष्ठा,संत कबिरांची सत्यशोधक वृत्ती,महात्मा फुल्यांची सामाजिक क्रांती,शिवरायांची न्यायबुद्धी,शाहू महाराजांचे विशाल अंतःकरण,बाबासाहेबांचा संघर्ष त्याग विद्वता,भगवान बिरसांचे सामाजिक बंड,संत तुकोबांचे समाज प्रबोधन,संत सेवालालांचे भजो मत पुजो मत छाणजो पचच माणजो ची शिकवण,जिजाऊंचे संस्कार,अहिल्यामाई चे नेतृत्व व कर्तृत्व,सावित्रीआईंचे शिक्षण निर्धार,फातिमा दिदींचे शिक्षण सहकरिता,रमाईचा त्याग व कारुण्यशीलता,अण्णाभाऊंची प्रतिभा समजून घेण्यासाठी संघटनेची गरज आहे.*
*30.विस्कळितांना व्यवस्थित करण्यासाठी संघटनेची गरज आहे.*
*31.बहुजन समाजातील अज्ञान,उदासीनता, विस्कळीतपणा,मला काय त्याचे वृत्ती घालविण्यासाठी संघटनेची गरज आहे.*-
*मोहनभाऊ मारोतराव देवतळे**राष्ट्रीय अध्यक्ष**अ.भा.मादगी समाज संघठना, म.रा.*
0 Comments