सावली: सावली तालुक्यातील पांगरसडा येथे मेंढपाळावर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले आहे. ही घटना शनिवारी रात्री घडली. भीमा कन्नावार राहणार बेंबाळ, तहसील मुल जिल्हा चंद्रपूर असे जखमी झालेल्या मेंढपाळाचे नाव आहे.
कळपातील दोन मेंढ्यांना सुद्धा जखमी करून एका मेंढीला वाघाने उचलून नेले असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. जखमी ला गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या घटनेमुळे घरी असलेल्या पत्नीला धक्का बसला असून त्यांना सावरण्यासाठी बेंबाळ गावातील माजी उपसरपंच श्री मुन्ना भाऊ कोटगले यांनी तात्काळ नामदार सुधीर मुनगंटीवार, चंदू जी मारगोनवार यांच्याशी संपर्क साधून त्यांना मदत मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
मुन्ना भाऊ कोटगले यांचा फोन जाताच पंचायत समितीचे माजी सभापती चंदू भाऊ मार्गनवार यांनी स्वतः रुग्णांच्या नातेवाईकांशी संपर्क करून परिस्थिती जाणून घेतली. आर्थिक सहकार्यासाठी प्रयत्न चालू असल्याचे सांगण्यात आले आहे.
0 Comments