Ticker

6/recent/ticker-posts

जाम तुकूम येथे आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत शिलाफलकाचे अनावरण



जाम तुकूम येथे आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत शिलाफलकाचे अनावरण


पोंभुर्णा: तालुक्यात सर्वत्र आजादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमांतर्गत मेरी माटी मेरा देश हा उपक्रम मोठ्या प्रमाणात प्रत्येक ग्रामपंचायतीत राबवल्या जात आहे.


मेरी माटी मेरा देश अभियाना अंतर्गत जामतुकुम येथील ग्रामपंचायत येथे भालचंद्र जी शंकरराव बोधलकर सरपंच यांच्या हस्ते शीला फलकाचे अनावरण करण्यात आले. या अभियाना निमित्त दिनांक 13 ते 15 ऑगस्ट पर्यंत विविध उपक्रम राबवण्यात येणार आहे. दिनांक 14 ऑगस्ट रोजी शीला फलकाच्या अनावरांना प्रसंगी विविध उपक्रम राबवण्यात आले.


याप्रसंगी ग्रामपंचायतचे सचिव श्री टी एन शेंडे साहेब ,त्याचप्रमाणे ग्रामपंचायत कर्मचारी आणि गावातील नागरिक उपस्थित होते.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव




Post a Comment

0 Comments