===================
गडचिरोली / प्रतिनिधी दि.22 आगष्ट 2023:-
आरमोरी येथील पॅराडाइज इंग्लिश मिडियम स्कूलचा वर्ग १० मध्ये शिकत असलेल्या सुधांशु चक्रधर मेश्राम या विध्यार्थ्यांची गडचिरोली जिल्हा स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.. आरमोरी येथे तालुका स्तरीय स्पर्धेत प्रावीण्य मिळविल्यानंतर जिल्हास्तरीय बुध्दिबळ स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. आपल्या यशाचे श्रेय आई - वडील , मोठे बंधू प्रबुद्ध मेश्राम , बुध्दिबळ खेळाचे शिक्षक , विशाल सपाटे यांना दिले. पॅराडाईज इंग्लिश मिडियम स्कूल मधुन निवड करण्यात आलेला सुधांशु मेश्राम हा एकमेव विध्यार्थी आहे. जिल्हास्तरीय बुध्दिबळ स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल मित्रमंडळींनी पुढील यशस्वितेसाठी शुभेच्छा दिल्या.
0 Comments